वृत्तसंस्था
नवी दिल्ली : Indians परराष्ट्र राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह यांनी गुरुवारी लोकसभेत सांगितले की, २०२४ मध्ये २,०६,३७८ भारतीयांनी आपले नागरिकत्व सोडून इतर देशांचे नागरिकत्व स्वीकारले. कीर्ती सिंह म्हणाले की, नागरिकत्व सोडण्याची कारणे वैयक्तिक आहेत आणि ज्या व्यक्तीने हा निर्णय घेतला आहे त्यालाच हे माहिती आहे.Indians
ते म्हणाले की, सरकार अनिवासी भारतीयांशी संबंध वाढवण्यावर भर देत आहे, त्यांच्या ज्ञानाचा आणि नेटवर्कचा फायदा घेत आहे. यशस्वी आणि प्रभावशाली अनिवासी भारतीय देशाची सॉफ्ट पॉवर मजबूत करतात असा सरकारचा विश्वास आहे.Indians
सरकारने गेल्या ५ वर्षांचा डेटादेखील सादर केला. या आकडेवारीनुसार, २०२४ मध्ये भारतीय नागरिकत्व सोडणाऱ्यांची संख्या २०२० च्या तुलनेत जवळजवळ अडीच पट जास्त आहे.Indians
२०२० च्या तुलनेत २०२४ मध्ये अडीच पट जास्त लोकांनी नागरिकत्व सोडले
काँग्रेस खासदार केसी वेणुगोपाल यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री कीर्ती यांनी गेल्या पाच वर्षांचा डेटाही दिला. सरकारच्या म्हणण्यानुसार, २०२० मध्ये ८५,२५६ लोकांनी, २०२१ मध्ये १,६३,३७० लोकांनी, २०२२ मध्ये २,२५,६२० लोकांनी आणि २०२३ मध्ये २,१६,२१९ लोकांनी भारतीय नागरिकत्व सोडले. यापूर्वी, २०११ मध्ये ही संख्या १,२२,८१९, २०१२ मध्ये १,२०,९२३, २०१३ मध्ये १,३१,४०५ आणि २०१४ मध्ये १,२९,३२८ होती.
२०२० नंतर नागरिकत्व सोडणाऱ्यांची संख्या वाढत आहे
२०२० पासून नागरिकत्व सोडणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. राज्यसभेत सादर केलेल्या आकडेवारीनुसार, २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये थोडीशी घट झाली आहे. त्याच वेळी, गेल्या तीन वर्षांत हा आकडा दोन लाखांच्या वर राहिला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App