वृत्तसंस्था
डेहराडून : काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांनी आज एका वेगळ्याच मुद्द्यावर केंद्रातल्या मोदी सरकारला घेरले आहे. भारताच्या पाकिस्तान वरच्या युद्ध विजयाचा आज स्वर्णिम विजय दिन आहे. या महत्त्वाच्या कार्यक्रमात मोदी सरकारने निमंत्रण पत्रिकेत देखील दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा उल्लेख केलेला नाही.1971 war against Pakistan; Modi government didn’t mentioned Indira Gandhi’s name in swarnim vijay divas program, Allaged Rahul Gandhi
यावरूनच राहुल गांधी यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. उत्तराखंड मध्ये विजय संकल्प मेळाव्यात ते बोलत होते. राहुल गांधी म्हणाले, की 1971 च्या युद्धात दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कणखर भूमिकेमुळे आणि नेतृत्वामुळे भारत आणि पाकिस्तानवर विजय मिळवला. सर्व भारतीय एकजुटीने लढले आणि हा विजय मिळवला आहे.
परंतु ज्या कणखर नेतृत्वने म्हणजे इंदिरा गांधींनी आपल्या शरीरावर बत्तीस गोळ्या झेलल्या त्या इंदिराजींचा साधा उल्लेख देखील सरकारने निमंत्रण पत्रिकेवर केलेला नाही. करण हे सरकार सत्याला सामोरे जायला घाबरते, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी केंद्रातल्या मोदी सरकारवर तोफ डागली आहे.
1971 च्या युद्धात इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. त्यांनी युद्ध जिंकले. पण सिमला करारात भारताला काहीशी माघार घ्यावी लागली. हा करार त्यावेळी वादग्रस्त ठरला होता. त्यावेळच्या जनसंघाने सिमला करारावर टीकास्त्र सोडले होते. पण नंतर जसा काळ बदलला तशी शिमला करारावर भाजपच्या अटल बिहारी वाजपेयी सरकारने देखील शिक्कामोर्तब केले होते. या कराराच्या आधारावरच वाजपेयी यांनी पाकिस्तानचे लष्करशहा जनरल परवेज मुशर्रफ यांच्याशी वाटाघाटी केल्या होत्या.
या पार्श्वभूमीवर सध्याच्या मोदी सरकारने इंदिराजींचा उल्लेख निमंत्रण पत्रिकेत केलेला नाही. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वर्णीम विजय दिनानिमित्त दिलेल्या संदेशात भारतीय सैन्यदलाच्या शौर्याची मुक्तकंठाने स्तुती केली आहे. परंतु, त्यातही इंदिराजींच्या कणखर नेतृत्वाचा उल्लेख नाही. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी केंद्रातल्या मोदी सरकारवर तोफ डागली आहे
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App