150 dogs buried alive : कोणत्याही संवेदनशील माणसाच्या मनाचा थरकाप उडवणारी घटना कर्नाटकातून समोर आली आहे. राज्यात 150 माकडांना मारल्यानंतर आता पुन्हा एकदा क्रौर्याची हद्द ओलांडण्यात आली आहे. कथितपणे 150 भटक्या कुत्र्यांना शिवमोगामध्ये जिवंत पुरण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस सूत्रांनी बुधवारी या घटनेची माहिती दिली. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी ग्रामपंचायत अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 150 dogs buried alive in shivamogga karnataka Reports
वृत्तसंस्था
बंगळुरू : कोणत्याही संवेदनशील माणसाच्या मनाचा थरकाप उडवणारी घटना कर्नाटकातून समोर आली आहे. राज्यात 150 माकडांना मारल्यानंतर आता पुन्हा एकदा क्रौर्याची हद्द ओलांडण्यात आली आहे. कथितपणे 150 भटक्या कुत्र्यांना शिवमोगामध्ये जिवंत पुरण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस सूत्रांनी बुधवारी या घटनेची माहिती दिली. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी ग्रामपंचायत अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
ही संपूर्ण घटना भद्रावती शहराजवळील कंबादललू-होसूर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील रंगनाथपुरा येथे घडली. हा परिसर कर्नाटकची राजधानी बंगळुरूपासून सुमारे 270 किमी अंतरावर आहे. प्राथमिक तपासात ही घटना 4 सप्टेंबर रोजी घडल्याचे उघड झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी कथितपणे कुत्र्यांना तम्मदीहल्ली जंगल परिसरात पुरले आहे.
कुत्र्यांचे सतत भुंकणे ऐकून स्थानिक लोकांना संशय आला आणि मग अचानक आवाज येणे बंद झाले. स्थानिक लोकांनी प्राणी हक्क कार्यकर्त्यांना ही माहिती दिली. यानंतर कार्यकर्त्यांनी घटनास्थळी भेट देताच ही घटना उघडकीस आली. हे प्रकरण भद्रावती ग्रामीण पोलीस ठाण्याने ताब्यात घेतले आहे, परंतु घटनेमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही.
तथापि, प्राथमिक तपासात असे निष्पन्न झाले आहे की, ज्या कंत्राटदाराने न्यूट्रिंगचा ठेका घेतला होता, त्याने (न्यूट्रींग ही एक शस्त्रक्रिया आहे ज्यामुळे कुत्र्यांना प्रजनन करता येत नाही.) पैसे वाचवण्यासाठी असे क्रूर कृत्य केले आहे. पोलीस सूत्रांनी सांगितले की, पंचायत अधिकाऱ्यांनी यावेळी कुत्रे पकडणाऱ्यांना तोंडी सूचना दिल्या होत्या. पूर्वी कुत्रे उचलून दुर्गम भागात सोडले जात होते. यावेळी पोलिसांना संशय आहे की, त्यांनी कुम्बादललू-होसूर ग्रामपंचायतीच्या हद्दीत कुत्र्यांना जिवंत गाडले आहे.
150 dogs buried alive in shivamogga karnataka Reports
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App