कर्नाटक विधानसभा निवडणुकीअगोदर काँग्रेसला बसणार मोठा झटका! एचडी कुमारस्वामींच्या ‘या’ दाव्याने चर्चांना उधाण

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकात राजकीय घडामोडींना वेग

विशेष प्रतिनिधी

रामगर : कर्नाटक विधानसभा निवडणुकीअगोदर काँग्रेसला मोठा झटका बसणार असल्याचे दिसत आहे. कारण, जनता दलाचे नेते एचडी कुमारस्वामी यांनी म्हटले आहे की, येत्या काही दिवसांत काँग्रेसचे १५ नेते जेडीएस मध्ये प्रवेश करणार आहे. यामुळे कर्नाटकातील राजकीय वर्तुळात जोरदार चर्चांना उधाण आलं आहे. 15 Congress leaders will join JDS  Kumaraswamy claims

दुसरीकडे जेडीएसमध्ये सामील होणार्‍या काँग्रेस नेत्यांबाबत कुमारस्वामी म्हणाले की, चित्रदुर्गातील विधान परिषदेचे माजी सदस्य रघू आचार आधीच बोलले होते आणि त्यांनी स्वत: जेडीएसमध्ये सामील होणार असल्याचे सांगितले होते. आता येत्या काही दिवसांत आणखी १५ नेते पक्षात प्रवेश करणार आहेत. ते म्हणाले, “जेडीएसला बुडवण्यासाठी आधी काँग्रेस नेत्यांनी आमदार फोडले. आता ते पुन्हा जेडीएस मध्ये काँग्रेसमध्ये येत आहेत.”

दरम्यान, बुधवारी माजी खासदार आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष)चे निलंबित नेते एलआर शिवराम यांनी बंगळुरूमध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष नलिंकुमार कटील आणि राष्ट्रीय सरचिटणीस सीटी रवी यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला आहे.

भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर शिवराम यांनी एएनआयला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले की, येत्या १० दिवसांत आणखी अनेक नेते भाजपमध्ये प्रवेश करतील. कर्नाटकच्या जनतेला राज्यात दुहेरी इंजिनचे सरकार हवे आहे आणि पक्ष कर्नाटकात बहुमताचे सरकार बनवेल.

जेडीएसला सोडचिठ्ठी का? –

“मी गेली ४० वर्षे राजकारणात आहे. मी युवक काँग्रेसमधून माझ्या कारकिर्दीची सुरुवात केली. पण जेडीएस आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये नेतृत्व करू शकलो नाही. अंतर्गत राजकारण आणि संघर्ष नियमितपणे होत असतात. तुम्हाला तुमच्या सूचना उघडपणे मांडण्याचा अधिकारही नाही. त्यामुळेच मी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.” असं शिवराम म्हणाले.

15 Congress leaders will join JDS  Kumaraswamy claims

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात