केरळमध्ये १४ जणांना झिका विषाणूची लागण, राज्यात अतिदक्षतेचा इशारा


विशेष प्रतिनिधी

तिरुअनंतपूरम : केरळमध्ये झिका विषाणूची १४ जणांना लागण झाली आहे, राष्ट्रीय विषाणूशास्त्र संस्थेने (एनआयव्ही) आणखी १३ जणांना या विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट केले. या प्रकारानंतर राज्यात दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.14 infected with Zika virus in Kerala

बाधितांमध्ये एका २४ वर्षीय गर्भवती महिलेचा समावेश असून तिला डासांमार्फत या विषाणूची लागण झाली आहे. एनआयव्हीकडे १९ नमुने पाठविण्यात आले होते त्यापैकी १३ नमुन्यांमध्ये झिकाची लागण झाल्याचे आढळले, असे राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात आले. ताप येणे, सांधेदुखी अशी या विषाणूची लागण झाल्याची लक्षणे आहेत.



झिका विषाणूच्या स्थितीची पाहणी आणि राज्य सरकारला सहकार्य करण्यासाठी सहा सदस्यीय तज्ज्ञांचे केंद्रीय पथक केरळला पाठविण्यात आले असल्याचे शुक्रवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले. राज्य आणि एम्समधील तज्ज्ञांचा समावेश असलेले सहा जणांचे पथक पाठविण्यात आले आहे, असे आरोग्य सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितले.

देशावर करोनाचं संकट घोंघावत असताना आता झिका विषाणूचे रुग्ण वाढत असल्याने चिंता वाढली आहे. तिरुवनंतपुरम जिल्ह्यात १४ जणांना झिका विषाणूची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. १४ जणांवर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलं आहे.

हा व्हायरस करोनाप्रमाणे जीवघेणा नसल्यामुळे पुरेशी काळजी घेतल्यास त्यावर मात करता येऊ शकते. डासांच्या चावण्यापासून स्वत:चा बचाव करणे आणि लागण झाल्यास पुरेसा आराम करणे आवश्यक असते. केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी तातडीची बैठक बोलावली असून परिस्थितीवर नजर ठेवण्यास सांगितलं आहे.

एडीस जातीचा डास चावल्यानंतर झिका व्हायरसची लागण होते. या डासांची निर्मिती चांगल्या पाण्यात होते. या डासामुळे डेंग्यू, चिकनगुनिया आणि पिवळा ताप होण्याची देखील शक्यता आहे. झिका व्हायरसचा सर्वाधिक धोका हा गर्भवती महिलांना असतो. विशेषत: याची लागण गभार्तील बाळाला होण्याची शक्यता असते. तसेच बाळाला विविध आजार देखील होण्याची शक्यता असते.

ताप येणे, अंग दुखणे, तसेच अंगावर लाल रंगाचे चट्टे येणे हे झिका विषाणूची प्राथमिक लक्षणं आहेत. या दरम्यान प्रचंड डोकेदुखी होते, डोळे लाल होणे, अशक्तपणा आणि थकवा देखील जाणवतो. ही लक्षणं दोन ते सात दिवसापर्यंत कायम राहतात. सुरुवातीला आलेल्या तापावरून झिका विषाणूची लागण झाल्याचं सांगणं कठीण आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने चाचणी करुन निदान करणं आवश्यक आहे.

डास चावण्यापासू संरक्षण करणे हाच सर्वात मोठा उपाय आहे. संशयित रुग्णांची वेळेवर चाचणी करणं गरजेचं आहे. हा व्हायरस डासांमुळे पसरत असल्याने तुमचा आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा. तसेच डबकी किंवा घरात फार दिवस पाणी भरलेलनं राहणार नाही याची काळजी घ्या, असे आवाहन करण्यात आले आहें.

14 infected with Zika virus in Kerala

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात