विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने बदला घेताना राबविलेल्या ऑपरेशन सिंदूर मध्ये मौलाना मसूद अजहर याचे एक-दोन नव्हे तर तब्बल 14 नातेवाईक मारले गेले, तरीदेखील मसूदची “शहादतची” खुमखुमी गेली नाही. आपले 14 नातेवाईक अल्लाला प्यारे झाले कारण ते अल्लातालाचे “प्रिय” लोक होते. मलाही “शहिदी” प्राप्त झाली असती तर बरे झाले असते, असे मौलाना मसूद अजहर म्हणाला.
याच मसूद अजहर याने भारतीय विमान अपहरण प्रकरणापासून ते संसदेवरच्या हल्ल्यापर्यंत सगळीकडे दहशतवाद माजवला होता. त्याने पोसलेल्या जैश ए मोहम्मद संघटनेने अक्षरधाम मंदिरावरही हल्ला केला होता. सर्व हल्ल्यांमध्ये शेकडो भारतीयांचा बळी गेला होता. पण त्यावेळी मसूद अजहर आपण काश्मीरचे स्वातंत्र्य युद्ध लढतोय, असे म्हणत होता.
भारताने ऑपरेशन सिंदूर मध्ये बहावलपूर मरकज सुभानल्ला या दहशतवादी अड्ड्यावर हल्ला केला. हल्ल्यातच मसूद अजहरचे 10 नातेवाईक आणि 4 म्होरके मारले गेले. त्यानंतर मसूद अजहर ढसाढसा रडल्याचे सांगितले गेले. बीबीसी उर्दूने सूत्रांच्या हवाल्याने ही बातमी मोठी चालवली. पण प्रत्यक्षात मसूद अजहर याची “शहादतची” खुमखुमी गेली नाही. आपली आई, भाऊ आणि त्याचे नातेवाईक हे सगळे अल्लाचे प्रिय होते म्हणून ते अल्लाताला कडे गेले. त्यांना “शहिदी” मिळाली. मलाही “शहिदी” मिळायला हवी होती, अशी पोस्ट मसूद अजहर याने केली.
मसूद अजहर याचे 14 नातेवाईक मारले गेल्याच्या बातम्या जरी इतर सर्व माध्यमांनी चालविल्या असल्या, तरी प्रत्यक्षात भारतीय परराष्ट्र मंत्रालय अथवा संरक्षण मंत्रालयाने या बातम्यांची पुष्टी केलेली नाही किंवा त्यांचा इन्कारही केलेला नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App