जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रगीतादरम्यान उभे न राहणाऱ्या 14 जणांना अटक; जबाबदार पोलिसांवरही कारवाई

वृत्तसंस्था

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरमध्ये राष्ट्रगीत सुरू असताना उभे न राहिल्याप्रकरणी पोलिसांनी 14 जणांना अटक केली आहे. प्रशासनाने अनेक पोलिसांना निलंबितही केले आहे. राष्ट्रगीत सुरू असताना प्रत्येक व्यक्तीने त्याचा आदर राखून उभे राहणे ही या पोलिसांची जबाबदारी होती.14 arrested for not standing during National Anthem in Jammu and Kashmir; Action will also be taken against the responsible police

हे प्रकरण 25 जून रोजी आयोजित ‘पॅडल फॉर पीस’ सायकलिंग शर्यतीच्या समारोप समारंभाशी संबंधित आहे. हा कार्यक्रम जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी आयोजित केला होता आणि त्यात लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा आणि डीजीपी दिलबाग सिंह उपस्थित होते.



कलम 107 आणि 151 अंतर्गत अटक

कार्यक्रमात राष्ट्रगीत वाजले, तेव्हा अनेकजण जाणीवपूर्वक त्याला आदर देण्यासाठी उभे राहिले नाहीत. राष्ट्रगीताच्या अनादराची गंभीर दखल घेत जम्मू-काश्मीर प्रशासनाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कलम 107 आणि 151 अंतर्गत 14 जणांना अटक करण्यात आली आहे. या दोन्ही कलमांमुळे गुन्हा केल्याचा संशय असलेल्या व्यक्तींना ताब्यात घेण्याचा किंवा अटक करण्याचा अधिकार पोलिसांना दिला जातो. अटक केलेल्या सर्वांची मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

14 arrested for not standing during National Anthem in Jammu and Kashmir; Action will also be taken against the responsible police

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात