प्रतिनिधी
पुणे – घरी निघालेल्या एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलीला तोंड दाबून भररस्त्यातून घरी उचलून नेले. त्यानंतर गुंडाने तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी अस्लम शौकत शेख (वय 21, रा. जनता वसाहत, पुणे) याला अटक केली आहे. याबाबत 12 वर्षाच्या मुलीच्या आईने दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.12 yr girl rape case registered in Dattawadi police station
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अस्लम शेख हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. शेख हा 12 वर्षाच्या मुलीला धमकावून वेळोवेळी जबरदस्तीने शरीर संबंध केले. 17 मार्च रोजी रात्री ही मुलगी घरी जात होती.
यावेळी अस्लम शेख याने या मुलीचे तोंड दाबून तिला ओढत जबरदस्तीने आपल्या घरात नेले. घरातील बाथरुममध्ये तिच्यावर बलात्कार केला. दत्तवाडी पोलिसांनी शेख याला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक जाधव अधिक तपास करीत आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App