मुंबईत 1140 मशिदी त्यापैकी 35 मशिदींचा कायदेभंग. त्यांच्यावर कारवाई करण्याची ठाकरे – पवार सरकारच्या गृह मंत्रालयाची ग्वाही… पण याचा अर्थ काय??… तर मनसेच्या आंदोलनाला पहिल्याच दिवशी 92% यश…!! मग भले संजय राऊत शिवसेनेचे हिंदुत्व हे सावरकर आणि बाळासाहेबांनी शिकवले आहे, असे म्हणतो…!! मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मशिदींवरच्या भोंग्यांविरुद्ध आवाज टाकला. ईदच्या दुसऱ्या दिवशीचा अल्टिमेटम दिला आणि निदान मुंबईतल्या 1140 पैकी 135 मशिदींनी कायदेभंग केला. पहाटे 5.00 वाजता भोंग्यावर आजान लावली. आता या 135 मशिदींवर कारवाई करणार असल्याची ग्वाही महाराष्ट्राच्या गृहमंत्रालयात दिली आहे. 135 out of 1140 mosques violated
गृह मंत्रालय – राज ठाकरे आकडेवारी समान
गृहमंत्रालयाची ही आकडेवारी आणि राज ठाकरे यांनी दिलेली आकडेवारी समान आहे. याचा अर्थ कायदेभंग किती मशिदींना केला यावर ठाकरे – पवार सरकार आणि राज ठाकरे यांच्यात एकमत आहे. आता जर या 135 मशिदींवर कारवाई होणार असेल, तर राज ठाकरे यांच्या भोंग्यांविरुद्धच्या आंदोलनाला 100 % यश मिळाल्याचे स्पष्ट होईल पण 135 मशिदींवर कारवाई करण्यास दिरंगाई झाली तरी 1140 – 135 म्हणजे 1105 एवढ्या मशिदींवरचे भोंगे उतरवलेत किंवा भोंग्यांचे आवाज कमी केलेत. याचा अर्थच असा की राज ठाकरे यांच्या भोंग्या विरोधातल्या आंदोलनाला 92% यश मिळाले आहे. मनसेचे 250 हून अधिक सैनिक पोलिसांनी ताब्यात घेतले. 250 सैनिकांच्या पोलिसी ताब्यामध्ये जर 92 % टक्के यश मिळत असेल तर असे यश यापूर्वी कुठल्याही पक्षाला मिळाले असेल, असे वाटत नाही…!!
तरीही सावध भूमिका
अर्थात राज ठाकरे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत तशी बरीच सावध भूमिका घेऊन हा विषय एका दिवसापुरता मर्यादित नाही. ज्यांनी भोंग्यांचे डेसिबल कमी केले, त्यांचे आभार. यांनी उतरवले त्यांचेही आभार पण जर मशिदींवर भोंगे परत लावले तर हनुमान चालीसा पुन्हा एकदा भोंग्यावर लावणारच, असाही इशारा त्यांनी देऊन ठेवला आहे. याचा ही अर्थ मनसे पहिल्या दिवसाच्या 92% यशावर खुश नाही. त्यांना 100 % यश अपेक्षित आहे, असाच होतो आहे. त्याचबरोबर त्यांचा मुद्दा संपूर्ण देशभर तापविण्याचा देखील मनसेचा मनसुबा यातून दिसून येत आहे. अर्थात मुंबईत जरी मनसेला पहिल्या दिवशी 92 % यश मिळाले असले तरी या पुढच्या काळात देशात त्यांना कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App