चार इमारतींमध्ये प्रत्येकी 80 निवासस्थाने उभारली जाणार
विशेष प्रतिनिधी
आहिल्यानगर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहिल्यानगर येथील पोलीस मुख्यालयामध्ये 102 कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे भूमिपूजन केले. या प्रकल्पांतर्गत 320 नवीन पोलीस निवासस्थाने आणि राखीव पोलीस निरीक्षक व पोलीस मुख्यालयाच्या प्रशासकीय इमारतीचा समावेश आहे.
या प्रशासकीय इमारतीमध्ये शस्त्रागार, टेंट हाऊस, क्रीडा साहित्य कक्ष, बँड रुम आणि बेल ऑफ आर्म्स यांसारख्या अत्यावश्यक सुविधा असतील. चार इमारतींमध्ये प्रत्येकी 80 निवासस्थाने उभारली जाणार पोलीस अंमलदार निवासस्थानामध्ये 2 बेडरूम, हॉल आणि किचन असलेली रचना असेल.
या वसाहतीत सोलर विद्युत प्रणाली, अंतर्गत रस्ते, स्ट्रीट लाइट्स, सांडपाणी शुद्धीकरण यंत्रणा, आणि अग्निशमन व्यवस्था यांसारख्या सुविधा उपलब्ध असणार आहेत. हा प्रकल्प पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासाच्या दर्जात मोठी सुधारणा करणार असून, त्यांच्या राहणीमानात सकारात्मक बदल घडवणार आहे.
यावेळी विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले, माजी मंत्री रवींद्र चव्हाण, विभागीय आयुक्त व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App