मागील ६५ वर्षांत भारतात ७४ विमानतळं होती, तर गेल्या ९ वर्षांतच अतिरिक्त ७४ विमातळं व हेलीपोर्ट उभारले गेले – ज्योतिरादित्य शिंदे

‘’पूर्वी देशात २०१३-१४ मध्ये फक्त ४०० विमाने होती, आज ती संख्या ७०० च्या पुढे गेली आहे.’’, अशीही माहितीही यावेळी शिंदे यांनी दिली.

विशेष प्रतिनिधी

चेन्नई : ‘’मागील ६५ वर्षांत भारतात ७४ विमानतळ होती, तर गेल्या ९ वर्षात, आम्ही अतिरिक्त ७४ विमानतळ आणि हेलीपोर्ट बांधले आहेत,  त्यांची संख्या दुप्पट करून १४८ वर नेली आहे आणि आम्ही पुढील ४-५ वर्षांत २०० हून अधिक विमानतळ, वॉटरड्रोम आणि हेलीपोर्ट बांधणार आहोत.’’ अशी माहिती नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज जाहीर भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दिली. In 65 years we had 74 airports in India In last 9 years we have built an additional 74 airports and heliports Jyotiraditya Scindia

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी चेन्नईमध्ये विमानतळ, महामार्ग आणि रेल्वे प्रकल्पांसह ५ हजार २०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन केले. यावेळी तामिळनाडूचे राज्यपाल आरएन रवी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव उपस्थित होते.

याप्रसंगी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले, “२०१३-२०१४ मध्ये भारतात ६ कोटी विमान प्रवासी होते, आता ते १४.५ कोटी झाले आहे. जिथे कोविडच्या आधी एका दिवसात ४.२ लाख प्रवासी विमानाने प्रवास करत होते, तिथे अडीच वर्षांतच हा आकडा मागे टाकून ४.५५ लाखांचा नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे.’’

याशिवाय, ‘’पूर्वी देशात २०१३-१४ मध्ये फक्त ४०० विमाने होती, आज ती संख्या ७०० च्या पुढे गेली आहे. एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीची कल्पना पंतप्रधानांनी केली होती, त्यानंतर ४७० विमानांची सर्वात मोठी ऑर्डर गेली.’’ अशी माहितीही यावेळी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली.

In 65 years we had 74 airports in India In last 9 years we have built an additional 74 airports and heliports Jyotiraditya Scindia

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात
    Icon News Hub