विशेष प्रतिनिधी
मुंबई : कोरोना लोकांच्या फुफ्फुसांवर हल्ला करतो. यामुळे ऑक्सिजनअभावी मोठ्या संख्येने लोकांचा मृत्यू झाला आहे. अशा परिस्थितीत, फुफ्फुसांना बळकट करणे महत्वाचे आहे. यासाठी आहारात काही गोष्टींचा समावेश करून आणि प्राणायाम करून ती मजबूत बनवू शकता. त्यामुळे ऑक्सिजनची पातळी वाढविण्यात मदत होईल. Yoga- Pranayama will Strengthen Lungs, Increase Oxygen: Ayurvedic substances are also useful
लसूण
लसूणमध्ये अँटी-ऑक्सिडंट, अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-बॅक्टेरियल आणि औषधी गुणधर्म आहेत. जीवनसत्त्वे, खनिजेही असतात. श्वास घेताना फुफ्फुसात धूळकण आणि बॅक्टेरिया आदी नकोसे पदार्थ जातात. लसूण हे पदार्थ काढून टाकून फुफ्फुस स्वच्छ करण्यात मदत करते. दररोज सकाळी अनाश पोटी लसणाच्या 3-4 पाकळ्या खाल्ल्याने फायदा होतो.
आले चहा
फुफ्फुसांना निरोगी ठेवण्यासाठी आल्याचा चहा पिणे फायदेशीर ठरते. आल्यामध्ये व्हिटॅमिन, कॅल्शियम, लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम, बीटा कॅरोटीन, अँटी-ऑक्सिडंट, अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-बॅक्टेरियल भरपूर प्रमाणात असते. अशा आल्याचा चहा पिण्यामुळे फुफ्फुसे निरोगी राहतात.
डाळींब
डाळिंबामध्ये लोह, फायबर, व्हिटॅमिन बी, सी, के, पोटॅशियम, जस्त आणि अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्म आहेत. यामुळे त्याच्या सेवनामुळे फुफ्फुस मजबूत बनतात. रोग प्रतिकारशक्ती वाढते. पचन सुधारते.
गुळण्या करा
कोरोना रोखण्यासाठी आणि फुफ्फुस निरोगी ठेवण्यासाठी गुळण्या हा एक उत्तम पर्याय आहे. ग्लासभर कोमट पाण्यात एक चिमूटभर हळद टाका. दिवसातून सुमारे 2 वेळा गुळण्या करा. हळदीमध्ये पोषक, अँटी-ऑक्सिडेंट आणि औषधी गुणधर्म असतात. कर्क्यूमिन घटक शरीर स्वच्छतेसाठी वरदान आहे. फुफ्फुसच नव्हे तर यकृत आणि हृदयसुद्धा निरोगी ठेवण्यात हळद उपयुक्त आहे. घशात दुखणे, घसा खवखवणे, कफ, खोकला आदी हंगामी आजारांपासून हळदीमुळे संरक्षण होते.
योग – प्राणायमावर भर द्या
योग्य आहारासह योग- प्राणायाम केल्याने फुफ्फुस निरोगी बनतात. स्वामी रामदेव यांचे योग- प्राणायम आरोग्यपूर्ण जीवनासाठी उपयुक्त आहेत. अनुलोम – विनिलोम, कपालभाती, भस्त्रिका, भ्रामरी आदी क्रिया केल्यास फुफ्फुसे स्वस्थ आणि ऑक्सिजनने परिपूर्ण राहिल्यास तुम्ही आरोग्यपूर्ण व्हाल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App