धक्कादायक : यासीन भटकळसह ११ दहशतवादी सुरतवर करणार होते अणुबॉम्ब हल्ला; न्यायालयात पुरावे सादर

वृत्तसंस्था

बेंगलोर : इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा यासीन भटकळ आणि त्याच्या ११ दहशतवाद्यांनी वर्ष २०१२ मध्ये गुजरातमधील सुरत शहरावर अणुबॉम्ब हल्ला करण्याचे कट कारस्थान रचले होते. तसे पुरावे तपास यंत्रणांनी न्यायालयात सादर केले आहेत. Yaseen bhatkal planned atomic bomb attack on surat, proofs produced in court

दिल्लीच्या पटियाला हाउस न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश शैलेंद्र मलिक यांनी सुनावणीत सांगितले की, आरोपींच्या विरूद्ध देशद्रोहाच्या कलमानुसार खटला चालवण्यासाठी आवश्यक पुरावे उपलब्ध आहेत. यासिन भटकळ आणि त्याच्या इतर सहकाऱ्यांसोबत झालेले संभाषण समोर आले आहे. ज्यामध्ये ते सर्व जण सूरतवर अणुबाँब हल्ला करणार होते. या हल्ल्यापूर्वी त्या ठिकाणच्या मुस्लिमांना तिथून नियोजनपूर्वक सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येणार होते, असे तपास यंत्रणांच्या तपासात समोर आले.



भारतातील शांतता आणि सामाजिक स्थिरता भंग करण्यासाठी हे दहशतवादी नवीन मुस्लिम तरुणांची भरती करत असतात. यात पाकिस्तानातील दहशतवाद्यांना भारतातील स्लीपर सेलचे संपूर्ण सहकार्य असते. भारतातील विभिन्न भागात, मुख्यत्वे राजधानी दिल्लीत बॉम्बस्फोट घडवण्याचा त्यांचा उद्देश होता. यासंबंधी सध्या तपास करत असलेली सरकारी संस्था, राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) न्यायालयाला दिलेल्या माहितीनुसार इंडियन मुजाहिदीन आणि या संबंधित असलेल्या इतर संस्था अशा स्वरूपाची दहशतवादी कारवाई करण्यासाठी परदेशातून पैसे मिळवतात. या संघटना बाबरी मस्जिद, गुजरातमध्ये झालेले दंगे यासारख्या घटनांचे दाखले देऊन मुसलमान तरुणांना भडकवण्याचे काम करतात.

या दहशतवाद्यांविरोधात आरोप दाखल 

या प्रकरणात यासिन भटकल, मोहम्मद दानिश अंसारी, मोहम्मद आफताब आलम, इमरान खान, सैयद, ओबैद योर रहमान, असदुल्ला अख्तर, उजैर अहमद, मोहम्मद तहसीन अख्तर, हैदर अली, जिया उर रहमान यांच्या विरोधात आरोप दाखल करण्यात आले आहेत.

Yaseen bhatkal planned atomic bomb attack on surat, proofs produced in court

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात