उद्धव ठाकरेंच्या “परवानगीने” अर्जुन खोतकर अखेर शिंदे गटात सामील!!


प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. जालन्याचे माजी मंत्री आणि शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी अखेर शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिंदे गटात सामील झाल्याची घोषणा त्यांनी जालन्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची परवानगी घेऊन, त्यांच्याशी चर्चा करूनच आपण शिंदे गटात सहभागी होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. With Uddhav Thackeray’s permission Arjun Khotkar finally joined the Shinde group

– राऊत, घोसाळकरांशीही चर्चा

मागच्या काही दिवसांपासून मराठवाड्यातील आक्रमक नेते अर्जुन खोतकर हे शिंदे गटात जाणार असल्याची, चर्चा होती. आता त्यांनी स्वत: आपण शिंदे गटाला समर्थन देत असल्याचे, जाहीर केले. यावेळी ते भावूकही झाले. उद्धव ठाकरेंशी बोलणे झाले. सकाळी सविस्तर बोललो. माझ्यावर जी परिस्थिती आली आहे, त्याबद्दल सांगितले.

मी त्यांच्या कानावर सर्व गोष्टी घातल्या. संजय राऊत, विनोद घोसाळकर यांच्याशी बोललो. मी एक सच्चा शिवसैनिक आहे. 40 वर्षांपासून मी शिवसेनेत आहे. त्यामुळे मला काही निर्णय घेणं भाग होतं. मी या सर्व गोष्टींबाबत पक्षप्रमुखांशी बोललो. काहीतरी परिस्थिती आहे म्हणून मी शिंदे गटात प्रवेश करत आहे, असे खोतकर यावेळी म्हणाले.

With Uddhav Thackeray’s permission Arjun Khotkar finally joined the Shinde group

महत्वाच्या बातम्या 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात