विशेष प्रतिनिधी
मुंबई : आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणातून वाचवण्यासाठी शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी आणि पंच साक्षीदार किरण गोसावी यांच्यात १८ कोटी रूपयांची डील झाली होती आणि त्यापैकी ५० लाख रूपयांचा पहिला हफ्ता देण्यासाठी पूजा ददलानी स्वतः लोअर परेला गेली होती, या आरोपांना पुष्टी देणारे सीसीटीव्ही फूटेज मुंबई पोलिसांना उपलब्ध झाले आहे. सहायक पोलिस आयुक्त मिलिंद खेताळे यांच्या टीमला पूजा ददलानीची मर्सिडीज गाडी लोअर परेल येथे गेल्याचे सीसीटीव्ही फूटेज मिळाले आहे.With Mumbai police got CCTV footage of Pooja Dadlanis car, Shahrukh Khan may be in trouble for giving ‘bribe’
किरण गोसावीचा माजी अंगरक्षक प्रभाकर साईलने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात गोसावी व ददलानी यांच्यात १८ कोटींचे डील झाल्याचा दावा केला होता. त्यास दुसरा मध्यस्थ सॅम डिसूझाने एका अर्थाने दुजोरा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी पूजा ददलानीच्या कारचे फूटेज मिळविले आहे. त्यानुसार, ५० लाखांच्या लाचेचा पहिला हफ्ता देण्यासाठी ती स्वतः लोअर परेलला किरण गोसावीकडे गेल्याचे सकृतदर्शनी दिसते आहे. प्रत्यक्षात तसे असल्यास पूजा ददलानी आणि पर्यायाने शाहरूख खानदेखील अडचणीत येऊ शकतो. कारण भारतीय कायद्यानुसार, लाच घेणारयांबरोबर लाच देणारेदेखील दोषी मानले जातात.
डिसूझाने दिलेल्या माहितीनुसार, आर्यन खानला सोडण्यासाठी १८ कोटींचे डील झाले होते. त्यापैकी ५० लाखांचा पहिला हफ्तादेखील देण्यात आला. मात्र, नंतर गोसावी हा फ्राॅड व्यक्ती असल्याचे लक्षात आल्यानंतर आम्ही त्याच्याकडून ३८ लाख रूपये वसूलही केले, असे डिसूझाने सांगितले आहे.
दरम्यान, डिसुझा यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने हा जामीन अर्ज फेटाळला आहे. सॅमने गोसावी यांना पूजाशी बोलायला लावले होते. अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी सॅमने उच्च न्यायालयात याचिका दाखल करून अपील केले. सॅमने सत्र न्यायालयात न जाता थेट उच्च न्यायालयात अर्ज केला होता. त्यामुळे उच्च न्यायालयाने बुधवारी सॅम डिसुझाचा जामीन अर्ज फेटाळला.
अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी सॅमच्या वकिलाने कोर्टाला सांगितले की, सॅम या प्रकरणात आरोपी नाही. अशा स्थितीत सॅमचा जामीन मंजूर व्हावा. मात्र, हायकोर्टात येण्यापूर्वी सॅमने सत्र न्यायालयात जायला हवे होते, असे हायकोर्टाने म्हटले आहे. असे म्हणत न्यायालयाने सॅमचा जामीन फेटाळला. सॅम डिसुझा यांच्या वतीने वकील अरुण राजपूत यांनी युक्तिवाद केला.
सॅम डिसूझाचा रोल काय?
काही दिवसांपूर्वी किरण गोसावी यांचे अंगरक्षक असलेल्या प्रभाकर साईल यांनी दावा केला होता की, गोसावी आणि सॅम डिसूझा यांच्यातील फोनवरील संभाषण त्यांनी ऐकले होते. आर्यन खान प्रकरण दाबण्यासाठी गोसावी सॅमला २५ कोटींची डील करण्यास सांगत होते. त्यानंतर गोसावी यांनी 18 कोटींमध्ये हा सौदा निश्चित करण्यास सांगितले. गोसावीने सॅमला शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानीसोबत हा करार करण्यास सांगितले. प्रभाकरने 18 कोटींपैकी 8 कोटी समीर वानखेडेला द्यायचे आहेत, असे गोसावींना फोनवरून सांगतानाही ऐकले होते.
यानंतर सॅम डिसूझा सोमवारी अचानक दिसले. त्याने एबीपी वृत्तवाहिनीला सांगितले की, आर्यन खानकडून ड्रग्ज जप्त करण्यात आलेले नाहीत. किरण गोसावी हा फसवणूक करत असून आर्यन खानला वाचवण्याच्या नावाखाली तो शाहरुख खानच्या मॅनेजरकडून पैसे उकळत होता. समीर वानखेडे यांच्या नावाने प्रभाकर सेलचा नंबर सेव्ह केल्याचेही त्याने सांगितले. त्यामुळे हा व्यवहार करताना तो एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या सतत संपर्कात असल्याचे दिसते. आर्यन निर्दोष आहे, त्यामुळे त्याला मदत करायला हवी, असे गोसावी म्हणाले होते, त्यामुळे पूजा ददलानीशी बोलण्यासाठी त्याने गोसावीला मदत केली, असे सॅम डिसूझा सांगतात.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App