विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीचे घोडे अर्थसंकल्पीय अधिवेशनात नहाणार का ?


वृत्तसंस्था

मुंबईः राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनला लवकरच सुरुवात होणार आहे. या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीचे घोडे नहाणार का ? , असा प्रश्न निर्माण होत आहे. Will the horses for the election of the Speaker of the Assembly will bathe in the budget session

यंदा अधिवेशन जवळपास २२ दिवस चालणार आहे. ३ मार्च ते २५ मार्च हा अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कार्यकाळ असून, ११ मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात होणार आहे. विशेष म्हणजे या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवड होणार असल्याची चर्चा आहे. पावसाळी अधिवेशन आणि हिवाळी अधिवेशन हे अध्यक्षांच्या निवडीविनाच गेले, परंतु यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अध्यक्षांची निवड होणार का ? हा प्रश्न आहे.काँग्रेसकडून चार नावे चर्चेत

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ऊर्जामंत्री नितीन राऊत, संग्राम थोपटे आणि के. सी. पाडवी यांची नावे चर्चेत आहेत. आमदार नाना पटोले यांनी ४ फेब्रुवारी २०२१ रोजी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.तेव्हापासून विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून नरहरी झिरवाळ यांच्याकडेच कामकाज आहे. १५ मार्च २०२० ला त्यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. अपेक्षेपेक्षा अधिक कार्यकाळ त्यांना मिळाल्याने अध्यक्ष व उपाध्यक्षपदाचा अनुभव त्यांना मिळत आहे.

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीसाठी महाराष्ट्राच्या विधानसभेने नियम बदलला होता. गुप्त मतदानाऐवजी आवाजी मतदानाने ही निवडणूक घेण्याचा ठराव महाराष्ट्राच्या विधानसभेने केला. पण राज्यपालांनी ही पद्धत घटनाबाह्य असल्याचे सांगितले. त्यामुळेच ही निवडणूक प्रक्रिया रखडली होती. आता पुन्हा एकदा या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने कंबर कसली आहे.

Will the horses for the election of the Speaker of the Assembly will bathe in the budget session

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय