विशेष प्रतिनिधी
मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या संदर्भात दोन ट्विट करून महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक कल्याण मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी वानखेडे यांची जात काढली आहे. “समीर दाऊद वानखेडे”, असे त्यांचे नाव टाकून “फर्जिवडा यहाँ से शुरू होता है” अशी टिप्पणी केली आहे.Will removing Sameer Wankhede’s caste solve serious legal cases against Aryan Khan or Sameer Khan?
त्याला अर्थातच समीर वानखेडे यांनी माझ्या वडिलांचे नाव दाऊद नसून ज्ञानदेव आहे, असे प्रत्युत्तर देत संताप व्यक्त केला आहे. माझे वडील हिंदू आहेत आणि आई मुस्लिम होती मी धर्मनिरपेक्ष कुटुंबातला आहे याचा मला अभिमान आहे, असे निवेदन करून समीर वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्या दाव्यातली एक प्रकारे हवाच काढून घेतली आहे.
पण मूळ मुद्दा त्यापुढचा आहे. समीर वानखेडे यांची जात काढून किंवा त्यांच्या पहिल्या लग्नाचा उल्लेख करून मूळ आर्यन खान किंवा नवाब मलिक यांचा जावई समीर खान यांच्याविरुद्धच्या कायदेशीर केसेसचे फास ढिले होतील का? हे खरे प्रश्न आहेत.
समीर वानखेडे यांच्या विरोधात जे 25 कोटीच्या लाचखोरीचे आरोप प्रभाकर साईल नावाच्या पंचाने केले त्याची शहानिशा आणि चौकशी करण्यासाठी दिल्लीचे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे तीन अधिकारी उद्या मुंबईत येत आहेत. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने नेमकेपणाने भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी दिल्लीतून अधिकारी येत असल्याचा खुलासा केला आहे. यामध्ये समीर वानखेडे यांच्या वैयक्तिक कोणत्याही बाबीचा अजिबात उल्लेख नाही.
त्यामुळेच नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची आर्यन खान आणि समीर खान यांच्या विरोधातील कायदेशीर कारवाई टत्याच्या मूळ पद्धतीनुसार चालण्याचेच एक प्रकारे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने “सूचित” केले आहे.
आर्यन खान प्रकरणात राजकीय वाद विवाद आणि धुरळा खूप उडविला असला तरी प्रत्यक्षात त्या केसची कायदेशीर बाजू किती मजबूत आहे, यावरच नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचा खटला न्यायालयात टिकणार आहे. त्याच बरोबर नवाब मलिक यांचा जावई समीर खान याच्या जामीनावर विरोधात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो मुंबई उच्च न्यायालयात गेले आहे.
ती केसही नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो )ने मागे घेतलेली नाही. त्यावर सुनावणी होणे अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर समीर वानखेडे यांच्या कथित भ्रष्टाचाराची चौकशी होणार असली तरी आर्यन खान आणि समीर खान यांच्या विरोधातील कायदेशीर केसेस पातळ होण्याची फारशी शक्यता दिसत नाही किंवा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने तशी हिंटही कुठे दिलेली नाही.
उलट समीर वानखेडे यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप होताच त्याची खात्याअंतर्गत चौकशी करण्यासाठी टीम पाठवून आपला “प्रोफेशनल प्रॉम्प्टनेस” नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो सिद्ध करू पाहत आहे आणि यातच पुढच्या कायदेशीर कारवाईची “खरी मेख” दडली आहे. राजकीय धुरळा उडवून या केसेस मधले कायदेशीर गांभीर्य कोणाला कमी करता येण्याची शक्यता वाटत नाही.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App