बंडा नंतरच्या शक्यता : आपल्या सेनेचे क्रेडिट एकनाथ शिंदे स्वतःहून राज ठाकरेंना देतील??

नाशिक : महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडवून देणारे नेते एकनाथ शिंदे हे आपला आमदारांचा गट कायद्याच्या दृष्टीने आवश्यक असणारी प्रक्रिया म्हणून कोणत्या तरी एका पक्षात विलीन करतील, असे बोलले जात आहे. त्याबद्दलची लढाई आता आज सुप्रीम कोर्ट मध्ये सुरू होणार आहे. परंतु दरम्यानच्या काळात एकनाथ शिंदे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना फोन करून त्यांच्याशी राजकीय चर्चा केल्याच्या बातम्या आल्या आहेत आणि त्यातूनच एकनाथ शिंदे हे असा आपला गट राज ठाकरे यांच्या मनसे मध्ये विलीन करण्याच्या बातम्यांना पेव फुटले आहे.Will eknath shinde give wholesome political credit to Raj Thackeray??

एकनाथ शिंदे यांच्या गटाला पक्षांतर बंदी कायद्याच्या तरतुदीनुसार कोणत्या तरी एका पक्षात विलीन व्हावे लागेल. मग त्यांच्यापुढे तीन पर्याय उपलब्ध असतील. भाजप, बच्चू कडूंची प्रहार संघटना आणि तिसरा मनसे त्यातही मनसे एकनाथ शिंदे यांच्यासाठी अधिक जवळचा पर्याय असल्याचे बोलले जात आहे. कारण मनसे प्रमुखांच्या आडनावात ठाकरे आहे. राज ठाकरे आणि शिवसेनेच्या आमदारांची जवळकी ही गोष्ट फार जुनी आहे. उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना ठाकरे नाव वगळून जगून दाखवा. शिवसेना वगळून जगून दाखवा, असे आव्हान दिले होते.या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना हे नाव निदान पोस्टरवर तरी सोडले आहे. पण ठाकरे हे नाव केवळ उद्धव ठाकरे यांची मक्तेदारी नाही तर राज हे देखील ठाकरेच आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे हा मनसे विलनीकरणाचा मार्ग स्वीकारू शकतात, अशी चर्चा आहे.

परंतु या चर्चेपलिकडचा एक प्रश्न अधिक महत्त्वाचा आहे. तो म्हणजे जे छगन भुजबळ, नारायण राणे आणि दस्तूर खुद्द राज ठाकरे यांना जमले नाही ते एकनाथ शिंदे यांनी करून दाखवले. शिवसेनेचे तब्बल विद्यमान ४० आमदार फोडून दाखवले त्यांना एकत्र ठेवले एवढे मोठे राजकीय कर्तृत्व दाखवल्यानंतर या राजकीय कर्तृत्वाचे क्रेडिट एकनाथ शिंदे हे सहजासहजी आपण स्वतः सोडून इतर कोणाला आयते मिळवून देतील का?? हा कळीचा प्रश्न आहे!!

सध्याच्या पेचप्रसंगातून कायदेशीर मार्ग काढण्यासाठी अन्य कोणते पर्याय उपलब्ध करून घेणे शिंदे यांना शक्य होणार आहे का?? हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. सुप्रीम कोर्टाच्या आजच्या सुनावणीतून या प्रश्नाला काही उत्तर मिळण्याचा मार्ग खुला होतो आहे का??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Will eknath shinde give wholesome political credit to Raj Thackeray??

महत्वाच्या बातम्या