स्टॅन स्वामी यांचा राऊतांना पुळका ; सत्ता स्वार्थासाठी शिवसेनेने हिंदुत्व सोडले


 

विशेष प्रतिनिधी

मुंबई : शिवसेनाप्रमुखांचे हिंदुत्व सोडून स्वतःचा नवपुरोगामी आणि नवसेक्युलरपणा बटबटीत दर्शविण्यासाठी आज संजय राऊत यांना फादर स्टॅन स्वामीचा पुळका आला आहे. ते फारच शोकविव्हळ असतील तर शिवसेनेने दहा दिवसांचा दुखवटा पाळावा व मातोश्रीवर सुतुक देखील पाळावे, अशी टीका भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी केली आहे.Why sanjay Raut Taking side of Father Stan swami : Shivray kulkarni

केंद्राकडे बोट दाखवण्याच्या सवयीनुसार मोदी सरकारला हुकूमशहा वगेरे म्हणून संजय राऊत मोकळे झाले आहे. गलितगात्र म्हातारा दोषी नसतो तर मग सोशल मिडियावर केवळ एक व्यंगचित्र टाकले म्हणून निवृत्त नेव्ही अधिकाऱ्याचा डोळा फोडेपर्यन्त मारहाण करण्याच्या वेळी आपण का गप्प बसला होता ? कंगनाचे घर पाडताना, सोशल मिडियावर पोस्ट केली म्हणून पोलिसांचा जुलूम करणाऱ्या तुमच्या सरकारच्या हुकूमशाहीचा पाढा मोठा आहे. तुम्हाला बोलण्याचा नैतिक अधिकार तरी आहे का ?



मृत फादर स्टॅन स्वामी वर एनआयएने गंभीर स्वरूपाचे आरोप ठेवले आहेत. एनआयएची चार्जशीट म्हणते त्यांच्या तपासात उघड झाले की ‘भूमिगत असलेला माओवादी मोहन याच्याकडून स्टॅन स्वामीला नक्षली कारवायांसाठी ८ लाख रुपये दिले गेले.

सत्ता स्वार्थासाठी हिंदुत्व सोडलेल्या शिवसेनेला या प्रकरणाचे गांभीर्य समजू नये, हे जास्त घातक आहे. तुकडे तुकडे गॅंग मध्ये समाविष्ट होण्यात शिवसेना उतावीळ झाली असल्याचे आजच्या संजय राऊत यांच्या लेखावरून स्पष्ट दिसते, अशी टीका शिवराय कुळकर्णी यांनी केली आहे.

  • सत्ता स्वार्थासाठी शिवसेनेने हिंदुत्व सोडले
  • स्टॅन स्वामी यांचा संजय राऊत यांना पुळका
  • मग, शिवसेनेने दहा दिवसांचा दुखवटा पाळावा
  • हवे तर मातोश्रीवर सुतुक देखील पाळावे
  • स्टॅन स्वामीला नक्षली कारवायांसाठी ८ लाख रुपये
  • गलितगात्र म्हातारा दोषी नसतो तर नेव्ही अधिकाऱ्याला का बदडले
  • कंगनाचे घर पाडताना हुकूमशाहीच दिसली

Why sanjay Raut Taking side of Father Stan swami : Shivray kulkarni

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात