श्रद्धाच्या तक्रारीवर 2 वर्षांपूर्वी पोलिसांनी का नाही केली कारवाई?, फडणवीसांचे चौकशीचे आदेश


वृत्तसंस्था

मुंबई : आफताब अमीन पूनावाला याच्यापासून आपल्या जीवाला धोका असल्याची तक्रार 2020 सालीच श्रद्धा वालकरने केली होती. आफताबने गळा दाबून हत्या करण्याची धमकी दिल्याचे तिने या तक्रारीत म्हटले होते. आफताबच्या कुटुंबियांना या संपूर्ण प्रकरणाची कल्पना होती, असा उल्लेखदेखील श्रद्धाने आपल्या तक्रारीत केला होता. वसईच्या तुळींज पोलीस स्टेशनमध्ये तिने ही तक्रार केली होती. 2 वर्षांपूर्वीच श्रद्धाने व्यक्त केलेली भीती खरी ठरली. तिने दाखल केलेल्या तक्ररीच्या पत्राच्या आधारे हिंदुस्थान पोस्ट वेबपोर्टलने ही बातमी दिली आहे.Why didn’t the police take action on Shraddha’s complaint 2 years ago

श्रद्धाने तक्रार केलेले हे पत्र आपण पाहिले आहे. त्या पत्रावर पोलिसांनी त्यावेळी का कारवाई केली नाही?, आपल्या मनातही हा प्रश्न आहे. त्यामुळे त्याची चौकशी निश्चित केली जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्याच वेळी त्यांनी दोन वर्षांपूर्वीच श्रद्धाच्या पत्रानुसार पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली असती तर श्रद्धाचा जीव कदाचित वाचला असता, असे वक्तव्य केले आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या या वक्तव्यानंतर श्रद्धाच्या हत्या प्रकरणाला वेगळे वळण लागून या संपूर्ण प्रकरणाची खोलवर चौकशी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

तुकडे करण्याची दिली होती धमकी 

दोन वर्षांपूर्वी म्हणजेच 23 नोव्हेंबर 2020 ला श्रद्धाने वसईच्या तुळींज पोलीस स्टेशनमध्ये आफताब विरोधात तक्रार दिली होती. या तक्रारीनुसार, श्रद्धाने आफताबच्या मारहाणीमुळे आपण गंभीर जखमी झाल्याचे म्हटले आहे. तसेच, त्याने आपल्याला गळा दाबून मारण्याची आणि तुकडे करण्याची धमकी दिल्याचेही तिने आपल्या तक्रारीत म्हटले होते. श्रद्धाने दिलेल्या तक्ररीच्या पत्रात असे म्हटले आहे की, या सर्व प्रकरणाबाबत आफताबच्या घरच्यांना संपूर्ण कल्पना आहे. ते विकेंडमध्ये त्याला भेटायला येतात. त्याने जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही त्यांना माहिती आहे, असे या पत्रात श्रद्धाने लिहिले आहे.

मागच्या सहा महिन्यांपासून होतोय छळ….

श्रद्धाने दोन वर्षांपूर्वी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मागच्या सहा महिन्यांपासून आफताब मला मारहाण करत आहे. लवकरच आम्ही लग्न करणार होतो. परंतु आता मला आफताबसोबत रहायचे नाही. तसेच, भविष्यात माझे काही बरे वाईट झाले तर त्याला सर्वस्वी जबाबदार आफताब असेल.

मात्र त्यावेळी पोलिसांनी श्रद्धाच्या तक्रारीवर नेमकी काय कारवाई केली?, याचे उत्तर सध्या कोणाकडेही नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना या संदर्भात प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी दोन वर्षांपूर्वी कारवाई पोलिसांनी कारवाई का केली नाही?, याची चौकशी केली जाईल, असे वक्तव्य केले आहे. त्याचबरोबर कदाचित पोलिसांनी योग्य वेळी कारवाई केली असती तर श्रद्धाचा जीव वाचला असता असेही त्यांनी म्हटले आहे.

Why didn’t the police take action on Shraddha’s complaint 2 years ago

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण