बारसू प्रकल्पासाठी आता शरद पवारांना का भेटता?, उद्धव ठाकरेंनी दाबली शिंदे – फडणवीस सरकारची नस

प्रतिनिधी

मुंबई : रत्नागिरीतील बारसू रिफायनगरींच्या मुद्द्यावरून शिंदे – फडणवीस सरकार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांशी चर्चा करत आहे. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही फोनवरून शरद पवारांशी रिफायनगरींच्या मुद्द्यावरून चर्चा केली. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी शरद पवारांची भेट घेऊन चर्चा केली. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी, मला पवारांच्या अंमलाखाली गेला असे म्हणत होतात, मग बारसू बाबत आता शरद पवारांचा सल्ला का घेता??, असे म्हणत शिंदे – फडणवीस सरकारची नस दाबली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय अमित शाह यांनाही इशारा दिला. Why are you meeting Sharad Pawar now for the Barsu project?

नक्की काय म्हणाले उद्धव ठाकरे? 

सोमवारी, महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ’ सभा ही मुंबईतील बीकेसी मैदानावर झाली. या सभेमध्ये बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘बारसूमध्ये सुद्धा माझ्या नावाने पत्र दाखवतायत, उद्धव ठाकरेंनीच ही जागा सुचवली होती. हो सुचवली होती. आपल्या सरकारने सुचवली होती. पण त्या पत्रामध्ये असं कुठे लिहिलंय का? पोलिसांना घुसवा, लाठ्या चालवा, अश्रू धुरांच्या नळकांट्या फोडा, गोळ्या चालवा पण वेळे प्रसंगी रिफायनगरी करा, असं माझ्या पत्रात लिहिलंय आज आपण तिघंही एकत्र आहोत. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना. जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं, तेव्हा हे बोंब काय मारत होते? की हे म्हणजे मी पवार साहेबांच्या अंमला खाली गेलो. राष्ट्रवादी दादागिरी करतंय. पण आज उदय सामंत पवारसाहेंबांना भेटून आले आहेत. तुम्ही गेला तर चालतं. तुम्ही करालं ते वाटेल ते. पण उद्धव ठाकरेंनी करायचं नाही.’

‘शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेची स्थापना केली होती, तेव्हा तुमचा थांगपत्ताही नव्हता. आज हे शेफारलेली लोकं आहेत, हे मला बाळासाहेब शिकवतायत. त्यांना मला सांगायचं आहे, अनेक जण तुम्ही बाळासाहेबांना भेटलाही नव्हता. पण स्वतः शरद पवार साहेबांकडे गेले काय करू? काय करू?. मग का सल्ला घ्यायला जाता तुम्ही? का विचारपूस करायला जाता तुम्ही? बरं बारसूचं पत्र मी दिलं होत आणि तुम्ही बारसू बारसू करत स्वतः बारसं करून घेत असाल, तर पालघरमध्ये आदिवासींच्या घरात पोलीस का घुसवले?,’ असा सवाल उद्धव ठाकरेंनी सरकारला केला.

https://youtu.be/VtbD2V4OMzw

अमित शाहांना काय दिला इशारा?  

भाषणाच्या शेवटी उद्धव ठाकरेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना इशारा दिला. उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘महाराष्ट्राची अवहेलना आणि मुंबईचं वस्त्रहरण थांबवण्यासाठी वज्रमूठचा एकच ठोसा असा मारा की, पहिला महापालिका येऊ द्या, विधानसभा येऊ द्या, नाहीतर लोकसभेसोबत तिन्ही निवडणुका घ्या, तुम्हाला आम्हाला भुईसपाट केल्याशिवाय राहणार नाही. आणि अमित शाहांना सांगतो, तुम्हाला जमीन म्हणजे काय असते, तो माझ्या महाराष्ट्रातला माणूस दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही.

Why are you meeting Sharad Pawar now for the Barsu project?

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात
    Icon News Hub