विशेष प्रतिनिधी
मुंबई : मातोश्रीवर हनुमान चालिसा म्हणण्यासाठी निघालेल्या राणा दांपत्याला अटक केल्यावर उध्दव ठाकरे सरकारवर चोहो बाजुने टीका होत आहे “शिवसेनेची सत्ता असलेल्या महाराष्ट्रात हनुमान चालीसा म्हणणे गुन्हा आहे. या गुन्ह्यासाठी उद्धव ठाकरेंच्या पोलिसांकडून लोकांना अटक केली जात आहे. औरंगजेब मेला असे कोण म्हणाले? असा सवाल भारतीय जनता पक्षाचे महाराष्टÑ प्रभारी सी. टी. रवी यांनी केला आहे.Who says Aurangzeb is dead, after the arrest of Rana couple, BJP leader C. T. Ravi’s question
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या दांपत्याला अटक केल्यावर रवी यांनी ट्विट केले आहे. त्यांनी ठाकरे सरकारला सवाल केला आहे. नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरू तेग बहादूर यांच्यावर औरंगजेबाने केलेल्या जुलूमाची आठवण करून दिली होती.
राणे दाम्पत्याला उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी येण्यापासून रोखण्यासाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी खार येथील राणेंच्या निवासस्थानाला घेराव घातला होता. मात्र, पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर रवी राणा आणि नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानासमोर हनुमान चालिसाचा जप करण्याची योजना रद्द केली.
पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या वेळी अशांतता निर्माण होऊ नये असे त्यांनी म्हटले होते. तरीही पोलीसांनी राणांवर आयपीसी कलम 153 (ए) (धर्म, वंश, जन्मस्थान, निवासस्थान, भाषा इत्यादींच्या आधारावर वेगवेगळ्या गटांमध्ये शत्रुत्व वाढवणे आणि पूर्वग्रहदूषित कृत्ये करणे) या अंतर्गत गुन्हा दाखल केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App