प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात शिंदे – फडणवीस सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पात वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये भरीव तरतुदी असताना उद्धव ठाकरे आणि अजितदादांनी मात्र अर्थसंकल्पावर शरसंधान साधले आहे. उद्धव ठाकरे यांनी याचे वर्णन गाजर हलवा या शब्दात करून त्यावर टीका केली आहे. मात्र अजितदादा आणि उद्धव ठाकरे यांच्या प्रतिक्रियांपेक्षा वेगळ्याच मुद्द्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. While Uddhav Thackeray spoke to journalists ajit Pawar winked at some one, but who was he??
उद्धव ठाकरे अर्थसंकल्प सादर होताना आज विधिमंडळात आले होते. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर विधानसभेतले विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकारांना त्यावर प्रतिक्रिया दिली आणि त्यानंतर उद्धव ठाकरे पत्रकारांसमोर आले. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी अजितदादांना तुम्ही बोला, असा आग्रह केला. पण उद्धव साहेब आले आहेत. माझे झाले आहे मी पत्रकारांना सांगितले आहे. आता तुम्हीच बोला, असे अजितदादांनी सांगून उद्धव ठाकरेंना पुढे केले. मात्र उद्धव ठाकरे बोलायला सुरुवात करताच अजितदादांनी त्यांच्या डावीकडे पाहून कुणाला तरी डोळा मारला आणि तो नेमका वेगवेगळ्या कॅमेऱ्यांनी टिपला.
त्यामुळे उद्धव ठाकरे आणि अजितदादांच्या अर्थसंकल्पावरल्या प्रतिक्रियांपेक्षा अजितदादांनी नेमका कुणाला डोळा मारला??, याचीच चर्चा राजकीय वर्तुळात जास्त रंगली.
उद्धव ठाकरे यांनी मध्यंतरी ते मुख्यमंत्री असताना अर्थसंकल्पातले आपल्याला काही कळत नाही, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासमोर सांगितले होते. अजितदादा त्यांच्याच मंत्रिमंडळात अर्थमंत्री होते त्यांनी अनेक अर्थसंकल्प मांडले होते. या पार्श्वभूमीवर तर अजितदादांनी उद्धव ठाकरेंना अर्थसंकल्पावर बोलायला पुढे करून त्यांच्या कुणा मित्राला डोळा तर मारला नाही ना??, अशी शंका राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App