मंत्री गुलाबराव पाटील यांनी रस्त्यांची तुलना अभिनेत्री हेमा मालिनीच्या गालांसोबत केली. रस्ते हेमा मालिनीच्या गालासारखे नसले तर राजीनामा देईन, असं वक्तव्य गुलाबराव पाटलांनी केलं.When will Gulabrao be removed from the ministry? ; Question posed by Chitra wagh
विशेष प्रतिनिधी
मुंबई : जळगाव जिल्ह्यात सध्या नगरपंचायतीच्या निवडणुका आहेत. यामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना एकमेकांच्या विरोधात लढत आहे.यावेळी एकनाथ खडसेंवर टीका करताना शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी रस्त्यांची तुलना अभिनेत्री हेमा मालिनीच्या गालांसोबत केली. रस्ते हेमा मालिनीच्या गालासारखे नसले तर राजीनामा देईन, असं वक्तव्य गुलाबराव पाटलांनी केलं. त्यावरून आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी थोबाड फोडण्याचा इशारा पाटलांना दिला आहे.
”शिवसेनेच्या नेत्यांना नेमक काय झाल आहे? कारण संजय राऊतांनंतर आत्ता गुलाबराव पाटील यांनी हेमा मालिनीबद्दल बेताल वक्तव्य केलं. गुलाबराव पाटील आणि रांझ्याचा पाटील या दोघांची वृत्ती सारखी आहे. महाराजांनी रांझ्याच्या पाटलाची पाटीलकी काढून घेतली होती.त्यामुळे आता गुलाबरावाची मंत्रिपदावरून हकालपट्टी कधी होणार?” असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला.
शिवीगाळ करणारे संजय राऊत उजळ माथ्यानं फिरताहेत.. गुलाबराव पाटलांना हेमा मालिनीचे गाल दिसताहेत.. पण पोलिस यंत्रणांना यांत महिलांचा विनयभंग दिसत नाही… मी गृहमंत्र्यांना आवाहन करतेय, तात्काळ गुन्हा दाखल करा.. नाहीतर गाल पाहणा-यांचे थोबाड फोडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. — Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar) (@ChitraKWagh) December 19, 2021
शिवीगाळ करणारे संजय राऊत उजळ माथ्यानं फिरताहेत.. गुलाबराव पाटलांना हेमा मालिनीचे गाल दिसताहेत.. पण पोलिस यंत्रणांना यांत महिलांचा विनयभंग दिसत नाही…
मी गृहमंत्र्यांना आवाहन करतेय, तात्काळ गुन्हा दाखल करा.. नाहीतर गाल पाहणा-यांचे थोबाड फोडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.
— Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar) (@ChitraKWagh) December 19, 2021
पुढे चित्रा वाघ म्हणाल्या की ”शिवीगाळ करणारे संजय राऊत उजळ माथ्यानं फिरत आहेत. गुलाबराव पाटलांना हेमा मालिनीचे गाल दिसत आहेत. पण यामध्ये पोलिस यंत्रणांना महिलांचा विनयभंग दिसत नाही का? मी गृहमंत्र्यांना आवाहन करतेय, तत्काळ गुन्हा दाखल करा. नाहीतर गाल पाहणाऱ्यांचे थोबाड फोडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही”, असा टोला चित्रा वाघ यांनी गुलाबराव पाटलांना दिला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App