Nitin Raut : विराट कोहलीने कसोटी क्रिकेटच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. विराटने हा निर्णय खूप विचारपूर्वक घेतला आहे, पण त्याचा हा निर्णय त्याच्या चाहत्यांसाठी आणि क्रिकेट जगताशी संबंधित अनेक खेळाडू आणि तज्ज्ञांसाठी अचानक धक्का देणारा आहे. When Virat resigns, it should be understood that the politics of prince in the cricket board has come down to a dirty level Says Nitin Raut
प्रतिनिधी
मुंबई : विराट कोहलीने कसोटी क्रिकेटच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. विराटने हा निर्णय खूप विचारपूर्वक घेतला आहे, पण त्याचा हा निर्णय त्याच्या चाहत्यांसाठी आणि क्रिकेट जगताशी संबंधित अनेक खेळाडू आणि तज्ज्ञांसाठी अचानक धक्का देणारा आहे.
विराटच्या या निर्णयावर अनेकांनी आपापल्या पद्धतीने प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्याची पत्नी अनुष्का शर्मानेही एक भावनिक पोस्ट केली आहे. भारतरत्न सचिन तेंडुलकरनेही आपली प्रतिक्रिया दिली असून, रोहित शर्मानेही विराटच्या या निर्णयाचा धक्का बसल्याचे ट्विट केले आहे.
पण एक प्रतिक्रिया या सगळ्यापेक्षा वेगळी आहे. विराटच्या या निर्णयाबाबत महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री आणि काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी बीसीसीआयच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत बीसीसीआय सचिव जय शहा यांच्यावर निशाणा साधला आहे.
भारताच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कप्तान विराट कोहली जेव्हा राजीनामा देतो तेव्हा समजावं की क्रिकेट बोर्डातील "शाहजाद्यांचं" राजकारण फार घाण पातळीवर उतरलंय. महंमद शमीच्या पाठीशी विराट पहाडासारखा उभा राहिला होता. — Dr. Nitin Raut 🇮🇳 (@NitinRaut_INC) January 16, 2022
भारताच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कप्तान विराट कोहली जेव्हा राजीनामा देतो तेव्हा समजावं की क्रिकेट बोर्डातील "शाहजाद्यांचं" राजकारण फार घाण पातळीवर उतरलंय.
महंमद शमीच्या पाठीशी विराट पहाडासारखा उभा राहिला होता.
— Dr. Nitin Raut 🇮🇳 (@NitinRaut_INC) January 16, 2022
नितीन राऊत यांनी ट्विट करून आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी लिहिले की, “भारताच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कप्तान विराट कोहली जेव्हा राजीनामा देतो तेव्हा समजावं की क्रिकेट बोर्डातील “शाहजाद्यांचं” राजकारण फार घाण पातळीवर उतरलंय. महंमद शमीच्या पाठीशी विराट पहाडासारखा उभा राहिला होता.”
दरम्यान, बीसीसीआयने विराट कोहलीच्या निर्णयाचा आदर करत त्याचे अभिनंदन केले आहे. क्रिकेट निवड समितीनेही त्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. विराटच्या राजीनाम्यानंतर बीसीसीआयने त्याच्या निर्णयाबाबत दिलेल्या अधिकृत निवेदनात बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शाह, उपाध्यक्ष राजीव शुक्ला, कोषाध्यक्ष अरुण सिंह आणि संयुक्त सचिव यांची नावे समाविष्ट आहेत.
विराट कोहलीने सर्वप्रथम प्रशिक्षक राहुल द्रविड यांना आपला निर्णय सांगितला. यानंतर त्याने आपला निर्णय बीसीसीआयचे सचिव जय शाह यांना कळवला. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनीही विराट कोहलीच्या निर्णयाचा आदर करत त्याचे कौतुक केले.
When Virat resigns, it should be understood that the politics of prince in the cricket board has come down to a dirty level Says Nitin Raut
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App