माझी इच्छा नसताना नरसिंह राव यांनी मला दिल्लीतून महाराष्ट्रात परत पाठवले ; शरद पवार

प्रतिनिधी

मुंबई : 1990 च्या दशकात मी दिल्लीच्या राजकारणात सेट होत होतो. परंतु मुंबई बॉम्बस्फोट आणि दंगल या पार्श्वभूमीवर त्यावेळचे पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांनी माझी इच्छा नसतानाही मला दिल्लीतून महाराष्ट्रात नेतृत्व करण्यासाठी परत पाठविले, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केले.When I did not want to, Narasimha Rao sent me back to Maharashtra from Delhi: Sharad Pawar

81 व्या वर्षानिमित्त शरद पवार यांच्यावरील “अष्टावधानी” या ग्रंथाचे प्रकाशन मुंबईत करण्यात आले. त्यावेळी लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी शरद पवार यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत पवारांनी अनेक प्रश्नांना सविस्तर उत्तरे दिली.



दिल्लीत संरक्षण मंत्री असताना आणि केंद्रीय राजकारणात प्रस्थापित होत असतानाही आपण महाराष्ट्रात परत का आलात?, या प्रश्नावर तसेच काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढणार होते आणि म्हणून तुम्हाला महाराष्ट्रात पाठवण्यात आले का? या प्रश्नावर शरद पवार यांनी थेट उत्तर दिले. ते म्हणाले की, अजिबात इच्छा नसतानाही मला दिल्लीतून महाराष्ट्रात यावे लागले.

काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूकीत मी सीताराम केसरी यांच्यासमोर उभा राहिलो, पण उत्तर भारतातील आमच्या सर्व सहकाऱ्यांनी सीताराम केसरी यांना पाठिंबा दिला. दक्षिण भारतातील सहकाऱ्यांनी मला पाठिंबा दिला. परंतु, उत्तर भारतीय सहकाऱ्यांची संख्या अधिक असल्याने काँग्रेस अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मला यश आले नाही. ही वस्तूस्थिती आहे. पण तरीदेखील महाराष्ट्रात येण्याचा निर्णय अजिबात माझा नव्हता.

 नरसिंह रावांना कळवून परत दिल्लीला गेलो

1992 मध्ये बाबरी मशिदीचा प्रश्न आला आणि त्यानंतर दंगली झाल्या. जवळपास १४-१५ दिवस मुंबईचे जीवन उद्ध्वस्त झाले होते. तेव्हा मी संरक्षण मंत्री होतो. तेव्हा मला तुम्ही महाराष्ट्रात असला पाहिजे असे सांगण्यात आलं. मी आलो, पण माझ्या लक्षात आले की अशा संघर्षात निर्णय घेणारी ऑथिरिटी एकच असली पाहिजे.

तेव्हा मी आणि सुधाकरराव नाईक असे दोघे होतो. त्याचे दुष्परिणाम होतात असे माझ्या लक्षात आलं. तेव्हा मी नरसिंह राव यांना कळवून परत दिल्लीला गेलो, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

शरद पवार पुढे म्हणाले, पण नंतर मला पुन्हा महाराष्ट्रात यावे लागले कारण मुंबई क्लिप दंगल वाढली. तेव्हा वरिष्ठ नेत्यांची चर्चा झाली की मुंबई जाग्यावर आली नाही तर संपूर्ण जगात भारतात अस्थिरता पसरण्याचा संदेश जाईल. जगात मुंबईला अधिक आहे.

विशेषतः देशाची अर्थव्यवस्था मुंबईवर अवलंबून आहे. त्यामुळे मुंबई स्थिर झाली पाहिजे यासाठी मला पंतप्रधान नरसिंह राव यांनी आपल्या निवासस्थानी बोलावले. त्यांनी मला तुम्ही महाराष्ट्रात गेल्याशिवाय गत्यंतर नाही असे स्पष्ट सांगितले.

तरीही माझी दिल्लीतून महाराष्ट्रात यायची अजिबात इच्छा नव्हती. जवळपास सहा-साडेसहा तास नरसिंह राव आणि अन्य वरिष्ठ नेत्यांनी मला अत्यंत आग्रह केला. शेवटी मला काही भावनिक गोष्टी सांगितल्या. ज्या राज्यात तुम्ही वाढला,

ज्या राज्यातून तुम्ही इथपर्यंत आलात ते राज्य जळते आहे. अशावेळी तुम्ही जबाबदारी घेत नसाल तर त्याचे आम्हाला दुःख होते, असेही ते म्हणाले. त्यामुळे साहजिक त्या परिस्थितीत मला महाराष्ट्रात यायचा निर्णय घ्यावा लागला.

 १२ स्फोट झाल्याचे खोटे बोललो

यावेळी शरद पवार यांनी मुंबईत ११ बॉम्बस्फॉट झाले होते आणि ते हिंदूबहुल भागात झालेले असतानाही मी जाणीवपूर्वक १२ स्फोट झाल्याचे खोटे सांगितल्याचीही आठवण सांगितली. मुंबईत धार्मिक दंगल होऊ नये आणि हे स्फोट एका धर्माच्या विरोधात आहेत असं वाटू नये म्हणून मी ते खोटे बोललो. यामुळे दुसऱ्या दिवशी मुंबई रुळावर आली, असेही त्यांनी नमूद केले.

When I did not want to, Narasimha Rao sent me back to Maharashtra from Delhi: Sharad Pawar

 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात