सत्ता आल्यावर सात-बारा कोरा केला नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही म्हणणारे गेले कोठे? राजू शेट्टी यांचा सवाल


राज्यात सत्ता आल्यावर पाहिले काम शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा केला नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही असे बोलणारे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शेतकऱ्यांचा सात-बारा का कोरा केला नाही. आता ते कोठे गेले असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला. मुख्यमंत्री मुंबई मधून बाहेर पडत नाहीत उपमुख्यमंत्री कुणाचे ऐकत नाही अशी गत या सरकारची झाली आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.When he came to power, where did those who said that he would not tell the name of Pawar if he did not do 7/12 blank? Question by Raju Shetty


विशेष प्रतिनिधी 

मंगळवेढा : राज्यात सत्ता आल्यावर पाहिले काम शेतकºयांचा सात-बारा कोरा केला नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही असे बोलणारे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शेतकऱ्यांचा सात-बारा का कोरा केला नाही. आता ते कोठे गेले

असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला. मुख्यमंत्री मुंबई मधून बाहेर पडत नाहीत उपमुख्यमंत्री कुणाचे ऐकत नाही अशी गत या सरकारची झाली आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.मंगळवेढा येथे बोलताना शेट्टी म्हणाले,



नियमित कर्ज फेडणाऱ्यांना सूट देणार होते, सातबारा कोरा केल्याशिवाय गप्प बसणार नाही. अन्यथा पवारांची औलाद सांगणार नाही म्हणणारे आता कुठे गेले. या राज्यातील गरीब जनतेसाठी या सरकारने काय केले. ऊस तोडणी मजुरांसाठी काय केले. हमाली करणाऱ्यांसाठी काय केले.

या सरकारने यांचा विचारच केला नाही. कोरोनाच्या काळात शेतकरी महिला विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तेव्हा राज्य सरकारने का मदत केली नाही. शेतकऱ्यांच्या जिवालाच्या प्रश्नावर तुम्ही का बोलत नाहीत. एकदा मतदान झाले की लॉकडाउन लागू करणार. शेतकऱ्यांची लाईट कट केली जाणार. दुधाचे, डाळींबाचे ,द्राक्षाचे या सरकारने कोणताच निर्णय घेतला नाही.

शेतकऱ्यां ना पैसे देत नाहीत म्हणून विठ्ठल साखर कारखान्यावर जप्ती आणली. तरी देखील जिल्हाधिकारी जप्ती करत नाहीत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दबावापोटी ही कारवाई केली जात नाही. ३५ गावाला पाणी आणणार म्हणतात आणि मते घेतात. किती दिवस जनतेची दिशाभूल करणार, असा सवाल शेट्टी यांनी केला.

When he came to power, where did those who said that he would not tell the name of Pawar if he did not do 7/12 blank? Question by Raju Shetty

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात