जेव्हा फडणवीस दस्तूरखुद्द शरद पवारांची बाजू घेतात आणि काँग्रेसला सुनावतात…

जाणून घ्या नेमका काय आहे मुद्दा?, फडणवीसांनी ‘ते’ ट्वीट रीट्वीट करत वस्तूस्थिती दाखवून दिली आहे.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : सध्या गौतम अदानींच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी आण त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी रान उठवलेलं असताना, काँग्रेसचा मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी आणि अदानींच्या बाजूने जरा भूमिका मांडली की लगेच काँग्रेस नेत्यांचे पित्त खवळल्याचे दिसत आहे. महाराष्ट्रापासून ते दिल्लीपर्यंत विविध काँग्रेस नेते पवारांच्या भूमिकेवरून टिप्पणी करत आहेत. आता काँग्रेसच्या नेत्या अलका लांबा यांनी शरद पवार आणि गौतम अदाणी यांचा फोटो ट्विट करत टीका केली आहे. यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेते राहुल गांधींवर टीका करत काँग्रेसला सुनावले आहे. When Fadnavis sides with Sharad Pawar and criticizes Congress

अलका लांबा यांनी शरद पवार आणि गौतम अदाणी यांचा फोटो ट्विट करून लिहिले आहे की, “घाबरलेले, स्वार्थी लोकच आपल्या खासगी स्वार्थासाठी हुकूमशाही सत्तेचे गुणगान गात आहेत. पण, देशातील जनतेची लढाई राहुल गांधी एकटे लढत आहेत. जी, भांडवलदार चोरांशी आणि चोरांना संरक्षण देणाऱ्या चौकीदाराशी सुद्धआ आहे.”


अजितदादांची मोदी तारीफ, फडणवीसांची पवार स्तुती; खरंच होतीय का पुन्हा युती, की नुसतीच डोळे मारामारी??


हे ट्वीट रिट्वीट करून देवेंद्र फडणवीस यांनी, “राजकारण होते आणि जाते. पण, काँग्रेसच्या एका नेत्याने त्यांचा ३५ वर्षातील मित्रपक्ष आणि भारतातील सर्वात ज्येष्ठ राजकीय नेत्यांपैकी एक आणि महाराष्ट्राचे ४ वेळा मुख्यमंत्री असणाऱ्यांबद्दल केलेले ट्विट धक्कादायक आहे. भारतातील राजकीय संस्कृतीत राहुल गांधी भारताची राजकीय संस्कृती बिघडवत आहे.” अशी टीका राहुल गांधी आणि काँग्रसेवर केली आहे.

भाजपचे काँग्रेसला चिमटे

याशिवाय भाजपा प्रवक्ते शहजाद पुनावाला यांनी ही काँग्रेसची अधिकृत भूमिका आहे का?, असा बोचरा सवालही केला आहे. त्यावर अजून काँग्रेसचे अधिकृत उत्तर यायचे आहे, मात्र त्यापूर्वी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते जयराम रमेश यांनी ते पवारांचे वैयक्तिक मत असल्याचे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला आहे.

राहुल गांधींनी सातत्याने अदानींच्या शेल कंपनीत २० हजार कोटी रुपये आले कुठून?, हा प्रश्न लावून धरल्यानंतर काँग्रेस नेते देखील त्यांच्याभोवती एकवटले आहेत आणि ज्यावेळी शरद पवारांनी अदानी आणि मोदी यांना अनुकूल भूमिका घेताच ते पवारांवर तुटून पडले आहेत. अलका लांबा यांनी केलेले ट्विट त्याचेच निदर्शक आहे. तर, शरद पवारांची भूमिका त्यांची त्यांना लखलाभ होवो आम्ही अदानी आणि मोदी यांच्या विरोधात संघर्ष कायम ठेवून जिंकूच. असं नाना पटोले यांनी म्हटले आहे.

When Fadnavis sides with Sharad Pawar and criticizes Congress

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात