अनिल देशमुख यांचे बॉस मुंबईत असताना ते दिल्लीत कोणत्या व्हीआयपीला भेटणार??

अनिल देशमुख राजीनाम्यानंतर थेट दिल्लीत जाणार, पण कोणाला भेटणार याबाबत सस्पेन्स


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : अनिल देशमुख हे राजीनामा दिल्यानंतर आता ते थेट दिल्लीला येणार असल्याची माहिती पुढे येत आहे. राजीनामा दिल्यानंतर ते दिल्लीत कोणाला भेटणार याबाबत सस्पेन्स वाढला आहे. पण ही “व्हीआयपी” भेट असल्याची माहिती पुढे येत आहे. When Anil Deshmukh’s boss is in Mumbai, which VIP will he meet in Delhi?

शरद पवार हे पोटदुखीमुळे मुंबईतील घरी विश्रंती घेत आहेत. पवार हे देशमुख यांचे बॉस आहेत. ते मुंबईत असताना मग देशमुख हे दिल्लीत कोणत्या “व्हीआयपी”ला भेटत आहेत, याची चर्चा रंगली आहे. झी न्यूजने ही बातमी दिली आहे.तत्पूर्वी, आज अनिल देशमुख यांनी आपल्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपवला आहे. अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गंभीर आरोप केले होते. याबाबत एका याचिकेवर सुनावणीत उच्च न्यायालयाने या प्रकरणाचे सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत.

अनिल देशमुख हे दिल्लीत आता कोणाला भेटणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे. अनिल देशमुख हे राजीनामा दिल्यानंतर नागपूरला जातील अशी चर्चा होती. पण ते आता दिल्लीत येणार असल्याची माहिती पुढे आली आहे.

अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांची आता सीबीआय चौकशी होणार आहे. त्यामुळे महाविकासआघाडी सरकार पुन्हा बॅकफूटवर गेले आहे. अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे. राजीनामा देण्यात उशीर झाल्याचं फडणवीसांनी म्हटलं आहे.

अनिल देशमुख यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला. त्याआधी त्यांनी पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. When Anil Deshmukh’s boss is in Mumbai, which VIP will he meet in Delhi?

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*