राहुल कुल यांच्यावर 500 कोटींचा घोटाळा केल्याचा संजय राऊतांचा आरोप; पण खरे कारण काय??

विशेष प्रतिनिधी

मुंबई : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपचे आमदार राहुल कुल यांच्यावर भीमा पाटस कारखान्यात 500 कोटींचे मनी लॉन्ड्रींग घोटाळा केल्याचा आरोप करणारे पत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले आहे. त्याचे तपशील सोशल मीडियावर देखील त्यांनी जाहीर केले आहेत. पण संजय राऊत यांनी राहुल कुल यांच्यावर अचानक असे आरोप करण्याचे कारण काय??, याचा मागोवा घेतल्यावर त्याचा संबंध अनेकांनी संजय राऊत यांचा हक्कभंग ठरावाशी जोडला आहे. What is the real reason why Sanjay Raut accused rahul Kul of 500 crore scam

राहुल कुल हे संजय राऊत यांच्याविरुद्ध नेमलेल्या विधानसभेने नेमलेल्या हक्कभंग समितीचे अध्यक्ष आहेत. या समिती समोरच संजय राऊत यांना त्यांचे म्हणणे मांडायचे आहे. संजय राऊत हे विधिमंडळाला चोरमंडळ म्हणाले होते. त्या संदर्भात शिंदे गटाने त्यांच्याविरुद्ध हक्कभंगाचा प्रस्ताव आणला आहे. त्याची चौकशी आणि निर्णय देण्याचे काम हक्कभंग समिती करणार आहे आणि तिचे अध्यक्ष पद राहुल कुल यांच्याकडे आहे. त्यामुळे राहुल कुल यांना घोटाळ्यात अडकवण्याचा डाव संजय राऊत यांनी रचल्याचे काही माध्यमांच्या बातम्यांमध्ये म्हटले आहे.

पण राहुल कुल हे हक्कभंग समितीचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्यासमोर आपले म्हणणे मांडायचे आहे, या एकमेव कारणाने संजय राऊत यांनी राहुल कुल यांच्यावर 500 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे का??, हे पाहणे महत्त्वाचे आहे की त्यामागे आणखी काही वेगळीच कारणे आहेत?? हेही तपासून पाहिले पाहिजे.



भाजपने आपल्या मूळ नियोजनानुसार सध्या बारामती लोकसभा मतदारसंघावर विशेषत्वाने कॉन्सन्ट्रेट केले आहे. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पुढचा अमेठी लोकसभा मतदारसंघ असेल, याची निश्चिती भाजपने केली आहे. अमेठीतून भाजपच्या उमेदवार स्मृती इराणी यांनी राहुल गांधींचा 2019 च्या निवडणुकीत पराभव केला होता. तसाच शरद पवारांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांचा बारामती लोकसभा मतदारसंघात पराभव करण्याचा भाजपचा इरादा स्पष्ट आहे. अशावेळी भाजपला बारामती मतदारसंघात असलेल्या दौंड विधानसभा मतदारसंघात राहुल कुल यांचे बळ मिळू द्यायचे नाही आणि त्यांना शक्यतो वेगवेगळ्या चौकशांमध्ये अडकवायचे हा तर संजय राऊत यांनी केलेल्या आरोपाचा मूळ हेतू नाही ना??, अशी शंका राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल 2019 च्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्या समोर उभ्या ठाकल्या होत्या. सुप्रिया सुळे यांचे मताधिक्य त्यांनी 1 लाखांच्या खाली आणून दाखवले होते. शरद पवारांच्या राजकीय वर्चस्वाला सुरुंग लावण्यात त्या यशस्वी झाल्या होत्या.

2024 च्या लोकसभा निवडणुकीत पूर्वी सुप्रिया सुळे पायाला भिंगरी लावून बारामती मतदारसंघात फिरत आहेत. एक खासदार म्हणून त्या आपले कर्तव्य बजावत आहेत, पण या फिरण्यामागे पराभवाची भीती दडली आहे का?? आणि या पराभवाच्या भीतीतूनच एक दीर्घकालीन रणनीती म्हणून राहुल कुल यांच्यासारख्या भाजपच्या आमदाराला अडकवायचा हा प्रयत्न आहे का??, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.

राहुल कुल यांची पार्श्वभूमी देखील मूळात भाजपची नाही. ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच होते. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाशी त्यांचे फारसे जमले नाही. त्यामुळे त्यांनी आपला स्वतंत्र छोटा पक्ष काढून पाहिला. 2014 च्या निवडणुकीत दौंड विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला. पण 2019 मध्ये मात्र ते भाजपचे आमदार झाले. लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पत्नी कांचन कुल यांनी बारामती मतदारसंघात राष्ट्रवादीला धडकी भरवली होती. या पार्श्वभूमीवर राहुल कुल यांना 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राजकीय दृष्ट्या जेरबंद करायचा हेतू तर नाही ना?? आणि तो संजय राऊत यांच्या करवी शरद पवार पूर्ण करून घेत आहेत का??, अशी दाट शंका राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

What is the real reason why Sanjay Raut accused rahul Kul of 500 crore scam

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात