सध्या काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉर परिसरातील ज्ञानवापी मशिदीचा मुद्दा देश-परदेशात चांगलाच गाजतोय. या प्रकरणावर सध्या सुनावणी सुरू आहे. मंदिराच्या जागी मशीद उभारल्याचा दावा देखील करण्यात आला आहे. हे फक्त ज्ञानवापी मशिदीच्या बाबतीत घडले असे नाही, तर पुण्यात अशाच प्रकारे मंदिरे पाडून मशिदी – दर्गे उभारल्याचा इतिहास आहे. What is the history of the ancient Punyeshwar temple in Pune?
पुण्यातील प्राचीन पुण्येश्वर आणि नारायणेश्वर मंदिराच्या जागेवर दर्गे बांधल्याचा दावा मनसेने केला आहे. पण हा दावा फार जुना आहे. अनेक ऐतिहासिक ग्रंथांमध्ये याच्या नोंदी आहेत. ज्ञानवापी मशिदीप्रमाणे पुण्यातील या मंदिराच्या जागी धाकटा शेखसल्ला, थोरला शेखसल्ला यांच्या नावाने दर्गे उभारण्यात आले. या मूळ मंदिरांच्या मुक्तीसाठी लढा उभारण्यात येईल, असे मनसे नेते अजय शिंदे यांनी जाहीर केले आहे.
या पुण्येश्वर मंदिराला मोठा इतिहास असून अल्लाउद्दीन खिलजीचा सरदार मोठा अरब पुण्यावर चाल करून आल्यानंतर त्यांनी भगवान शंकराची दोन प्राचीन मंदिरे अर्थात पुण्येश्वर आणि नारायणेश्वर ही मंदिरे पाडली. त्याच जागी धाकटा शेख सल्ला आणि थोरला शेखसल्ला असे दोन दर्गे उभे केले. शनिवारवाड्यासमोर नव्या पुलाखाली एक दर्गा आहे, तर दुसरा लाल महाला जवळ आहे.
पुण्येश्वर मंदिराचे अवशेष सापडले
वरील शीर्षकाची बातमी 13 जुलै 2010 या दिवशी महाराष्ट्र टाईम्सच्या वेबपोर्टलवर प्रसिद्ध झाली आहे यामध्ये इतिहासकार पांडुरंग बलकवडे यांचाही हवाला दिला आहे.
कसबा पेठेतील एका इमारतीच्या बांधकामासाठी खोदकाम करताना धाकटा शेख सल्ला दर्गा परिसरात पुरातन पुण्येश्वर मंदिराचे अवशेष सापडले. ऐतिहासिक दाखले देणाऱ्या जागांवर पुरातत्त्व खात्याच्या देखरेखीशिवाय खोदकाम करू नये, अशी मागणी त्यावेळेपासून पुढे आली आहे.
पांडुरंग बलकवडे यांची मागणी
कसबा पेठेतील धाकटा शेख सल्ला र्दग्याच्या परिसरात नव्या इमारतीच्या बांधकामासाठी खोदकाम करताना पुण्येश्वर मंदिराचे अवशेष सापडले. या जागेत पूर्वी यादवांच्या काळातले पुण्येश्वर मंदिर होते हे सर्वज्ञात आहे. अशा ठिकाणी खोदकाम करण्यासाठी पुरातत्त्व खात्याची परवानगी घेणे बंधनकारक करण्याची मागणी इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे, सामाजिक एकता आणि संस्कृती रक्षा समितीतर्फे केली होती.
पुणे शहराचा इतिहास पाहाता बऱ्याच ठिकाणी पुरातन अवशेष गाडले गेलेले आहेत. त्यांचे जतन आणि अभ्यास होण्याची गरज असून यासाठी पुरातत्त्व खात्याची परवानगी घेण्याची सक्ती केली जावी, असे बलकवडे यांनी नमूद केले होते.
ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग आणि अन्य हिंदु देवदेवतांच्या मूर्ती सापडल्या. त्यानंतर मुस्लिम आक्रमकांचा विध्वंसक भेसूर चेहरा जगासमोर आला आहे. या पार्श्वभूमीवर देशभरातील मशिदी दर्गे यांची बांधकामे संशयाच्या भोवऱ्यात आली आहेत यापैकी ऐतिहासिक शहर पुणे मधील पुण्येश्वर आणि नारायणेश्वर यांच्या मंदिरांचाही समावेश आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App