विशेष प्रतिनिधी
नाशिक : उत्तर कोकणात आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढला असताना रविवारी सकाळीच मुंबईभरातील हवेत शेजाराच्या गुजरातेतील सौराष्ट्रातून आलेली वाळवंटातील वाळू मिसळली. रविवारची आरामात उठलेल्या मुंबईकरांना काही कळायच्या आतच संपूर्ण मुंबई आणि नजीकच्या परिसराची हवा बिघडली. दुपारपर्यंत वाळूच्या कणांनी नाशिक गाठले. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात थंड वाऱ्यांचा कहर सुरू आहे. Westerly winds: Saurashtra desert sand in Mumbai and Nashik
ही परिस्थिती आज दिवसभर राहणार असल्याचे मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने स्पष्ट केले. मात्र वाळूचे कण जास्त नसल्याने घाबरण्याचे कारण नाही, असा दिलासा मुंबई प्रादेशिक हवामान खात्याचे उपमहासंचालक जयंत सरकार यांनी दिला. उत्तरेतील थंडी राज्यात वाहून आणणारे पश्चिमी प्रकोप (वाऱ्याची वरच्या थरातील स्थिती) या स्थितीने किनाऱ्यानजीकच्या भागात प्रवेश करताना सौराष्ट्रातील वाळवंटातील वाळूचे कणही सोबत आणल्याने हवेचा दर्जा बिघडल्याची माहिती सरकार यांनी दिली. आज दृश्यमानता कमी राहील, असेही ते म्हणाले. उद्या सोमवारी वातावरण पूर्ववत होऊन आकाश ढगाळ राहील, असेही त्यांनी सांगितले.
नाशिकमध्ये रविवारी पहाटे वादळी वाऱ्यासह पाऊस झाला त्यानंतर दिवसभर थंड वारे वाद आहेत दुपारी देखील धोक्याची सादर उलगडली गेली नव्हती नाशिक मध्ये सोमवार मंगळवारी ढगाळ हवामान आणि पावसाचा अंदाज आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App