आम्ही ठाकरे सरकारच्या राज्यात होत असलेली हिंदूंची अवहेलना थांबविणार ; किरीट सोमय्यांचा यशोमती ठाकूर यांच्यावर घणाघात

यशोमती ठाकूर यांनी अमरावतीत येऊन त्यांना काय पुन्हा इथलं वातावरण भडकवायचं आहे का, असा सवाल केला होता.We will stop the contempt of Hindus taking place in the state of Thackeray government; Kirit Somaiya’s attack on Yashomati Thakur


विशेष प्रतिनिधी

अमरावती: त्रिपुरातील कथित घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी मुस्लिम समाजाने काढलेल्या मोर्चात मोठा हिंसाचार पाहायला मिळाला. अमरावती गेल्या काही दिवसांपासून हिंसाचारमुळे तणावपूर्ण वातावरणात आहे. त्यातच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी काल अमरावती दौऱ्यावर येण्याचं वक्तव्य केलं होत.

पोलिसांकडून सोमय्या यांना अमरावती दौरा रद्द करण्याची विनंती करण्यात आली आहे.दरम्यान यशोमती ठाकूर यांनी अमरावतीत येऊन त्यांना काय पुन्हा इथलं वातावरण भडकवायचं आहे का, असा सवाल केला होता. आता यावरच किरीट सोमय्या यांनी ट्वीट करत प्रतिउत्तर दिले आहे.

यशोमती ठाकूर म्हणाल्या की, किरीट सोमैया अमरावतीला येऊन काय करणार? याला प्रतिउत्तर देताना किरीट सोमय्या म्हणाले की , “आम्ही ठाकरे सरकारच्या राज्यात होत असलेली हिंदूंची अवहेलना थांबविणार.

अमरावती येथे त्यांच्यावर हल्ले झाले, त्यांचा संपतीची तोडफोड करण्यात आली.आम्ही त्यांच्या सोबत उभे राहणार आहोत. असे ट्वीट करत किरीट सोमय्या यांनी यशोमती ठाकूर यांना चांगलाच टोला लगावला आहे.

We will stop the contempt of Hindus taking place in the state of Thackeray government; Kirit Somaiya’s attack on Yashomati Thakur

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात