विशेष प्रतिनिधी
सिंधुदूर्ग : करेक्ट कार्यक्रम म्हणजे काय? संजय राऊत हा बोगस माणूस आहे. आम्ही जिथे दिसेल तिथे संजय राऊतांचा कार्यक्रम करू, असा इशारा माजी खासदार नीलेश राणे यांनी दिला आहे..We will do a correct program where Sanjay Raut is seen, Nilesh Rane’s warning
खासदार संजय राऊत यांनी नाशिकमध्ये बोलताना आम्ही आणखी एखादा करेक्ट कार्यक्रम करू असे राऊत म्हणाले होते. त्यावर पलटवार करताना राणे म्हणाले, करेक्ट कार्यक्रम म्हणजे काय?, संजय राऊत हा बोगस माणूस आहे. आम्ही जिथे दिसेल तिथे संजय राऊतांचा कार्यक्रम करू.
शिवसेनेवरही टीकास्त्र सोडताना राणे म्हणाले, शिवसेनेला आम्ही भीक घालत नाही. जन आशीर्वाद यात्रा आम्ही पूर्ण करणारच, असे ते म्हणाले. शिवसेनेकडे आचार-विचार राहिले नाहीत. शिवसेना केवळ अडवाअडवीची कामे करत आहे.
आम्ही त्यांना काडीचीही किंमत देत नाही. संजय राऊत यांनी एकदा आमच्या गर्दीत उभ रहावे आणि मग साहेबांचे विचार काय आहेत ते पहावे.केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यासाठी सगळी यंत्रणा कामाला लावण्यात आली. असे असले तरी ते मात्र काही करू शकले नाहीत. एक दिवस तरी त्यांना ठेवायचे होते, असे आव्हान त्यांनी दिले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App