शिवसेनेच्या एका नगरसेवकाने आमदारांच्या कार्यालयात बोलावून कार्यकर्त्यांना दारूवाटप केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आहे. यावरून टीका करताना सतत केंद्राकडे बोट दाखवणाऱ्या शिवसेनेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) चिमटा काढला आहे. आम्ही खंबा दिला, केंद्राने चकणा द्यावा, अशी टीका केली आहे. We gave the Khamba, the Center should give chakna, MNS’s criticism on Shiv Sena’s liquor distribution
प्रतिनिधी
ठाणे : शिवसेनेच्या एका नगरसेवकाने आमदारांच्या कार्यालयात बोलावून कार्यकर्त्यांना दारूवाटप केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आहे. यावरून टीका करताना सतत केंद्राकडे बोट दाखवणाऱ्या शिवसेनेला महाराष्ट्रनवनिर्माण सेनेने (मनसे) चिमटा काढला आहे. आम्ही खंबा दिला, केंद्राने चकणा द्यावा, अशी टीका केली आहे.
शिवसेनेचे नगरसेवक दीपक वेतकर यांनी आमदार रवींद्र फाटक यांच्या कार्यालयात चक्क दारूवाटप केले. कार्यकर्त्यांना दारू देतानाचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने हा प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी साामाजिक कार्यकर्त्यांनी ठाणे पोलिस आणि उत्पादन शुल्क विभागाकडे तक्रारही केली होता.
त्यानुसार मनसेने शिवसेनेच्या दारू वाटप कार्यक्रमाचे फोटो वापरून त्या शेजारीच नुकत्याच मनसे नेते अमित ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या आमरस पुरि वाटपाच्या कार्यक्रमाचे लावले. ‘फरक विचारांचा, वारसा संस्कारांचा’ अशा शब्दांत टीका केली आहे.
यासंदर्भातील अनेक मिम्स मनसेने तयार केली आहेत. त्यातून शिवसेनेवर निशाणा साधला आहे. आम्ही खंबा दिला, केंद्राने चकणा द्यावा या मिममधून शिवसेनेच्या सतत केंद्राकड बोट दाखविण्याच्या वृत्तीवरही मनसेकडून टीका करण्यात आली आहे
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App