बहोत बर्दाश्त किया अब बर्बाद भी हम ही करेंगे, असं म्हणत संजय राऊत यांनी विरोधकांना इशारा दिला आहे. यानुसार ते आज संध्याकाळी चार वाजता पत्रकार परिषदही घेणार आहेत. राऊतांची ही पत्रकार परिषद स्फोटक होणार असल्याचे बोलले जात होते. यावेळी साडेतीन नेत्यांची पोलखोल करणार असल्याचंही राऊतांनी आधी जाहीर केलं होतं. यावर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. भाजप नेते प्रसाद लाड यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. We are not afraid of such false threats, we will know who will fall asleep before four o’clock, Prasad Lad retaliates against Sanjay Raut
वृत्तसंस्था
मुंबई : बहोत बर्दाश्त किया अब बर्बाद भी हम ही करेंगे, असं म्हणत संजय राऊत यांनी विरोधकांना इशारा दिला आहे. यानुसार ते आज संध्याकाळी चार वाजता पत्रकार परिषदही घेणार आहेत. राऊतांची ही पत्रकार परिषद स्फोटक होणार असल्याचे बोलले जात होते. यावेळी साडेतीन नेत्यांची पोलखोल करणार असल्याचंही राऊतांनी आधी जाहीर केलं होतं. यावर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. भाजप नेते प्रसाद लाड यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.
प्रसाद लाड म्हणाले की, संजय राऊत यांना मी सांगू इच्छितो की, भाजप असल्या खोट्या धमक्यांना घाबरणारा पक्ष नाही. ईडीचे दाऊदसंबंधित जे छापे सुरू आहेत, त्यामध्ये अनेक राजकीय नेत्यांची झोप उडणार आहे. कोणाची झोप उडणार ते चार वाजण्याच्या आधीच राऊत यांना कळेल, असे लाड म्हणाले. त्यामुळे राऊत यांनी स्वत:ची झोप वाचवावी, असा टोलाही लाड यांनी लगावला. राऊत साडेतीन नावाचा चित्रपट काढणार का? हे बघावं लागेल, अशी टीकाही त्यांनी केली.
दरम्यान, पत्रकारांशी बोलत असताना राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्यांच्या आरोपांबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर अरे सोड रे असं उत्तर राऊतांनी दिलं. गुजरातमध्ये बँकेचा मोठा घोटाळा झाला. त्याकडेही ईडीनं लक्ष द्यावं. तब्बल २५ हजार कोटींचा घोटाळा झाला. दोन वर्षे हा घोटाळा दाबण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणात एफआयआरदेखील झाला नाही. या घोटाळ्यात कोणाचे लागेबांधे आहेत, या प्रकरणातील सूत्रधार कसे पळाले याचीही चौकशी व्हावी, अशी मागणी राऊत यांनी केली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App