संजय राऊतांचे “साडेतीन नेते” अजून गुलदस्त्यात; मराठी माध्यमांची पतंगबाजी मात्र उंच हवेत!!


विशेष प्रतिनिधी

मुंबई : संजय राऊत यांची कथित महास्फोटक पत्रकार परिषद शिवसेना भवनात आज दुपारी 4.00 वाजता होणार आहे. संजय राऊत यांनी भाजपचे साडेतीन नेते तुरुंगात जातील असे भाष्य आधी केले आहे. त्यांची नावे संजय राऊत यांनी घेतली नसली तरी फक्त “साडेतीन नेते” या मुद्द्यावर मराठी माध्यमांची पतंगबाजी मात्र जोरदार सुरू झाली आहे. आपल्याला हवी ती नावे घेऊन मराठी माध्यमांचे उतावळे घोडे जोरात धावायला लागले आहेत. Sanjay Raut’s “Three and a Half Leaders” still in bouquet; Kite flying of Marathi media, however, is in the air !!

संजय राऊतांनी अजून कोणत्याही भाजपने नेत्याचे नाव जाहीर केले नसले तरी मराठी माध्यमांनीच मीडिया ट्रायल करून देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, चंद्रशेखर बावनकुळे, प्रसाद लाड, किरीट सोमय्या यांची नावे संजय राऊत घेणार असल्याचे भासवून तशा पुड्या सोडून दिल्या आहेत. या प्रत्येकाच्या नावावर काही ना काही तरी घोटाळे आहेत, असा जावईशोध देखील मराठी माध्यमांनी लावून टाकला आहे.त्यामध्ये देवेंद्र फडणवीसांनी 2014 च्या निवडणुकीत प्रतिज्ञापत्रात माहिती लपविली, प्रवीण दरेकर यांच्या मुंबई बँकेच्या घोटाळ्यात त्यांचे नाव आहे, चंद्रशेखर बावनकुळे देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात ऊर्जामंत्री होते त्यामुळे ते शिवसेनेच्या टार्गेटवर आहेत. प्रसाद लाड राष्ट्रवादीचे नेते होते त्यानंतर भाजप मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या गोटात गेले. ते सध्या आक्रमक असल्याने त्यांच्यावर शिवसेना तोफा डागणार आहे, अशा आशयाच्या बातम्या मराठी माध्यमांनी देऊन आपल्या कल्पनाविलासात चे पतंग उंच उंच हवेत उडवले आहेत.

प्रत्यक्षात संजय राऊत यांची पत्रकार परिषद व्हायची आहे. ती महास्फोटक होणार की फुसका बार ठरणार?, हे अजून ठरायचे आहे. परंतु त्यापूर्वीच मराठी माध्यमांनी मात्र आपल्या कल्पना विलासाचे पतंग हवेत उडवून घेतले आहेत.

Sanjay Raut’s “Three and a Half Leaders” still in bouquet; Kite flying of Marathi media, however, is in the air !!

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती