आम्ही पिढ्यान पिढ्या हिंदू दलित, मग माझा मुलगा मुस्लिम कसा?; ज्ञानदेव वानखेडे यांचे नवाब मलिक यांना प्रत्युत्तर

वृतसंस्था

मुंबई : आर्यन खान केस प्रकरणात महाविकास आघाडीच्या ठाकरे – पवार सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांचा निकाहनामा ट्विटरवर सादर करून ते मुस्लिम असल्याचा दावा केला आहे. परंतु आता समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी नवाब मलिक यांना प्रत्युत्तर दिले आहे. We are Hindu Dalits for generations, then how can my son be a Muslim ?; Dnyandev Wankhede’s reply to Nawab Malik

माझे आजोबा पणजोबा खापर पणजोबा सगळे हिंदू दलित होते. मी स्वत: हिंदू दलित आहे. मग माझा मुलगा मुसलमान कसा होईल?, असे प्रत्युत्तर ज्ञानदेव वानखेडे यांनी नवाब मलिक यांना दिले आहे.

त्याच वेळी समीर वानखेडे यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर हिने देखील नवाब मलिक यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. ती म्हणाली की, नवाब मलिक यांनी सादर केलेला निकाहनामा खरा आहे. कारण समीरची आई मुस्लिम होती. तिच्या समाधानासाठी त्यावेळी त्याने निकाह केला होता. परंतु समीरने कधीही स्वतःचा धर्म आणि जात बदललेली नाही. कायद्याच्या नुसार तो हिंदू दलितच आहे. त्यामुळे नवाब मलिक यांनी सादर केलेले त्याचे बर्थ सर्टिफिकेट हे खोटे आहे.



समीर वानखेडे हा मुस्लिम असल्याचा नवाब मलिक यांचा दावा समीर वानखेडे यांचे वडील आणि पत्नी फेटाळल्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. समीर वानखेडे यांच्या व्यक्तिगत जीवनावर नवाब मलिक यांनी चिखलफेक केल्यामुळे आम्ही त्यांना बदनामीच्या खटल्यात कोर्टात खेचून असा इशारा देखील ज्ञानदेव वानखेडे यांनी दिला आहे.

We are Hindu Dalits for generations, then how can my son be a Muslim ?; Dnyandev Wankhede’s reply to Nawab Malik

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात