विशेष प्रतिनिधी
सोलापूर : युट्यूबवरील व्हिडिओ पाहून एटीएम फोडण्याचा युवकाचा प्रयत्न फसला असून त्याला सोलापूर पोलिसांनी अटक केली आहे. Watching a video on YouTube to smash an ATM Attempt: Thief arrested by Solapur police
युट्यूब वरील व्हिडिओच्या माध्यमातून प्रशिक्षण घेतलेल्या युवकाने नवीन गॅस कटर विकत घेतला. त्याच्या सहाय्याने एटीएम फोडण्याच्या तयारीत असताना त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
आकाश उडणशिवे, असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. दरम्यान, आरोपीकडून विजापूर नाका पोलिस हद्दीतील चार घरफोड्या उघडकीस आल्या असून यातून २ लाख ३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी आकाश हा अल्पशिक्षित असून, त्याच्यावर पुण्यामध्ये दुचाकी चोरी आणि सोलापूर शहरातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत सातपेक्षा जास्त गुन्ह्यांची नोंद आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App