नाशिक : कोरोना प्रकोपाच्या नावाखाली आज महाराष्ट्रातल्या ठाकरे – पवार सरकारने पंढरपूरच्या वारीवर बंदी घातली आहे. मर्यादित संख्येने वारकऱ्यांना परंपरेप्रमाणे पंढरपूरपर्यंत पायी जाऊ द्या, अशी वारकऱ्यांची मागणी आहे. कोविड प्रोटोकॉल पाळण्याचीही वारकऱ्यांची तयारी आहे. पण ठाकरे – पवार सरकारला हे मान्य नाही. त्यांनी पायी वारीवरची बंदी कायम ठेवली आहे.warkari broke the ban on pandharpur wari in 1944 imposed by the british
ब्रिटिश शासनाने देखील १९४४ साली पंढरीच्या वारीला अशीच बंदी घातली होती. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी एक पत्रक काढून त्याला विरोध केला होता. त्यांनी ब्रिटिश सरकारला बजावले होते की ख्रिश्चनांना रोम जेवढे पवित्र वाटते तेवढेच पावित्र्य पंढरपूराविषयी महाराष्ट्रीय जनतेला आहे.
युद्धकाळातही हजची यात्रा ब्रिटिश शासनाने चालू ठेवली असता या यात्रेवर बंदी का?, असा सवाल सावरकरांनी केला होता. यानंतर सावरकरांनी हिंदुसभेसाठी आणि वारकरी गटप्रमुखांच्या लढ्यासाठी योजना आखली होती. त्यात वारकऱ्यांनी बंदी न मानता पंढरपुराकडे वारी सुरू ठेवावी मग ते १० वारकरी असोत की १००००, अटक झाल्यास पांडुरंगाच्या नावे तुरुंगवास भोगावा या तुरुंगवासाचे पुण्य यात्रेसारखेच लाभेल. एकादशीच्या दिवशी पंढरपूर वासियांनी भगवी पताका घेऊन दर्शनाला पोचावे. अशी ही योजना होती.
ब्रिटिशांनी घातलेल्या बंदीचा राग पंढरपूरकरांच्या मनात होताच. त्यामुळे त्यांचा आणि वारकऱ्यांचा या अभिनव आंदोलनाला मोठा पाठिंबा तयार झाला होता. सावरकरांच्या या पत्रकानंतर ४ दिवसांतच ब्रिटिश सरकारला बंदी हुकूम मागे घ्यावा लागला होता. सावरकरांनी या निर्णायाचे स्वागत केले पण कार्यकर्त्यांना आंदोलनाच्या योजनेत कोणताही बदल करू, नये अशी सूचना दिली.
कारण अन्य काही निमित्त करून ब्रिटिश शासन बंदी हुकूम पुन्हा लागू करेल, अशी शक्यता होती. पंढरपूरात हिंदु महासभेची चांगली ताकद होती. या पक्षाच्या मार्गदर्शनाखाली त्या वर्षी पंढरपूर यात्रा जस्त मोठ्या प्रमाणात साजरी झाली. ब्रिटिश शासनाने पुन्हा बंदीचे नाव घेतले नाही.
भागानगर, भागलपूर नंतर पंढरपूर यात्रेनिमित्त हिंदु महासभेने जनाधार मिळवायला सुरूवात केली. सन १९४४ मध्ये सुमारे १.५ लाखांहून अधिक संख्येने वारकरी यात्रेत सहभागी झाले होते. ही आठवण चंद्रशेखर साने यांनी त्यांच्या ब्लॉगवर लिहिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App