वक्फ बोर्ड जमीन बळकावली, एमआयएमच्या माजी जिल्हाध्यक्षांवर गुन्हा दखल ; बीड जिल्ह्यात खळबळ

विशेष प्रतिनिधी

बीड – बीड जिल्ह्यात वक्फ बोर्डच्या मालमत्तेच्या गैरव्यवहारांची मालिका सुरूच आहे. एमआयएमच्या माजी जिल्हाध्यक्ष निजाम शेख यांनी बीड शहरातील एक एकर ८ गुंठे जमीन हडप केल्याचा आरोप झाला आहे. याप्रकरणी बीड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

Waqf board grabs land, files case against former MIM district president in Beed district

बीड शहराच्या मधोमध ही जमीन आहे. या जमिनीचे बनावट दस्तावेज तयार करून निजाम शेख यानी सदर जमीन हडप केल्याचा आरोप वक्फ बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. याप्रकरणी बीड शहर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वक्फ बोर्डच्या मालमत्ता गैरव्यवहाराची चार प्रकरणे आतापर्यंत समोर आली असून त्यात आणखी एकाची भर पडलीय.दरम्यान, ही जमीन वडिलोपार्जित असून मी कसलीही फसवणूक केली नाही.

बीड नगरपालिकेची निवडणूक तोंडावर आल्याने माझ्यावर जाणीवपूर्वक राजकीय हेतूने गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असा प्रतिआरोप एमआयएम नेते निजाम शेख यांनी केला आहे.

Waqf board grabs land, files case against former MIM district president in Beed district

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात