वाधवान – नवलानी – भोसले पैसे कुठून कसे गेले… अशा प्रकारे पत्रकार परिषदेत जुनीच नावे सांगून संजय राऊत हे मात्र आज कडेकडेने पोहोलेले दिसले…!! Wadhwan – Navlani – Bhosle; Where did the money come from?
संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेण्यात आली फार मोठा गौप्यस्फोट करणार असे वातावरण निर्माण केले होते. त्यांनी आरोप करताना दिल्लीतल्या भाजपचा बडा नेता मुंबईतला बडा नेता अशा भाषेत ते जरूर बोलले, पण त्यांची नावे मात्र त्यांनी सांगितली नाहीत. त्याच वेळी वाधवान – जितेंद्र नवलानी – किरीट सोमय्या अशी जुनीच नावे त्यांनी पत्रकार परिषदेत घेतली.
मात्र यावेळी पैसा नेमका कुठून आणि कसा गेला याचा थोडा तपशील त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितला. पण एकूण पत्रकार परिषदेत ते आजही कडेकडेनेच पोहलेले दिसले. कारण दिल्लीतला आणि मुंबईच्या भाजपचा बडा नेता अशा दोन नेत्यांची नावे त्यांनी आजच्या पत्रकार परिषदेत घेतली नाहीत. पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रातच फक्त छापे पडतात तसा जुनाच आरोप त्यांनी करून पुन्हा एकदा करून घेतला.
जितेंद्र नवलानी या व्यक्तीच्या माध्यमातून ईडी भ्रष्टाचाराचं रॅकेट चालवतं, असा सनसनाटी आरोप संजय राऊत यांनी केला. जितेंद्र नवलानी मोठमोठे बिल्डर्स, व्यावसायिकांना धमकावून पैसे वसुलीचे काम करतो, त्याचे अनेक पुरावे आहेत. कॅश, चेक, डिजीटल पेमेंटही केले जाते, असे राऊत यांनी सांगितले.
संजय राऊत यांनी दिली पुढची तारीख; दिल्लीतल्या भाजपच्या बड्या नेत्याची बेनामी प्रॉपर्टीचा गौप्यस्फोट करणार!!
संजय राऊत म्हणाले, की
सक्तवसूली संचलनालय अर्थात ईडीने दिवाण हाऊन्सिंग फायन्सासची २०१७ साली चौकशी सुरु केली. त्यानंतर जितेंद्र नवलानी खात्यावर 25 कोटी ट्रान्सफर झाले. मग 31 मार्च 2022 नंतर वाधवानच्या कंपनीकडून नवलानीच्या कंपनीला पैसे गेले. नंतर ईडीने अरविंद भोसलेंची चौकशी केली. मग भोसलेंकडून नवलानीला पैसे ट्रान्सफर झाले. अर्थात ईडीच्या कोणत्या अधिकाऱ्याच्या अकाऊंटमध्ये कुठे-कसे पैसे गेलेत, हे मी हळूहळू सांगेन. नवलानी हा व्यक्ती कोण आहे? किरीट सौमय्या आणि नवलानीचा काय संबंध आहे?, असे सवाल राऊतांनी उपस्थित केला.
आजच्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी जुनीच नावे घेतली. पण भाजप से बडे नेते कोण ही उत्सुकता कायम ठेवली. बाकीच्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जुनेच आरोप केले. केंद्रीय तपास संस्थांचा गैरवापर होत आहे. महाराष्ट्राकडे पण तपास संस्था आहेत. त्या तपास संस्था वापरून आम्ही पण छापे घालू शकतो, असे ते म्हणाले.
प्रत्यक्षात महाविकास आघाडीच्या 14 नेत्यांवर केंद्रीय तपास संस्थांच्या कारवाया सुरू आहेत, अशी कबुली त्यांनी दिली. पण महाराष्ट्रातल्या तपास संस्थांकडून अद्याप भाजपच्या नेत्यांवर कारवाई का होत नाही?, हा प्रश्न त्यांना विचारण्यात आला नाही. त्यामुळे त्यांनी त्याचे उत्तरही दिले नाही.
– मराठी माध्यमांचे रिपोर्टिंग
मराठी माध्यमांनी संजय राऊत यांचा बडा गौप्यस्फोट, संजय राऊत यांनी ईडी अधिकाऱ्यांविरुद्ध पुरावे सादर केले अशा हेडलाईन देऊन बातम्या केल्या. पण हे पुरावे होते की नुसतीच आरोपांची पुरवणी होती … आणि यातले कोणते कागद नेमके पोलिसांकडे गेले आहेत?, याचे तपशील मात्र मराठी माध्यमांनी सादर केले नाहीत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App