प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात राज्यसभेच्या 6 जागांसाठी मतदान आता शेवटच्या टप्प्यात आहे. जवळपास सर्वच पक्ष आणि अपक्षांच्या आमदारांचे मतदान पूर्ण झाले असून, आता या निवडणुकांच्या निकालाकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांसाठी ही निवडणूक म्हणजे अस्तित्वाची लढाईच मानली जात आहे. Voting is complete, Hitendra Thakur’s Bahujan Vikas Aghadi will get 3 votes “Game Changer
एमआयएम आणि समाजवादी पक्ष यांनी महाविकास आघाडीला मतदान केले असले तरी प्रत्यक्षात हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीची मते 3 मध्ये नेमकी कुणाला गेली आहे, हे गुलदस्त्यात असल्यामुळे ही मते “गेम चेंजर” ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
दोन्ही पक्षांच्या उमेदवाराला मिळणारे एकेक मत हे फार महत्वाचे आहे. महाविकास आघाडीत शिवसेनेसोबत असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आपली अतिरिक्त मते ही शिवसेनेच्या दुस-या उमेदवाराला दिल्यामुळे आता संजय पवारांच्या मतांमध्ये वाढ झाली आहे.
विजय कुणाचा?
शिवसेनेचे राज्यसभेसाठीचे दुसरे उमेदवार संजय पवार यांना शिवसेनेची 13, राष्ट्रवादी काँग्रेसची 9 तर काँग्रेसची 2 जादा मते मिळाली आहेत. त्यामुळे आता पवार यांच्या मतांमध्ये या 24 अतिरिक्त मतांची भर पडली आहे. पण निकाल अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या आमदारांनी नेमके कोणाला झुकते माप दिले, हे निश्चित नसल्यामुळे अजूनही संजय पवार यांच्या विजयाबाबत साशंकताच असल्याचे बोलले जात आहे.
बहुजन विकास आघाडी गेम चेंजर?
बहुजन विकास आघाडीचे विधानसभेत तीन आमदार आहेत. त्यामुळे या तिन्ही आमदारांची मते नेमकी कोणाला जातात, यावर निवडणुकीचं गणित अवलंबून असल्याचं बोललं जात आहे. बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांनी आपली भूमिका मतदान होईपर्यंत न सांगितल्यामुळे त्यांची मते नेमकी कोणाला जातात हे अजूनही गुलदस्त्यात आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App