पाच राज्यांच्या निवडणुकीत पहिल्या टप्प्यात उद्या मतदान; काँग्रेस, समाजवादी सह सर्व परिवारवादी पक्षांवर पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल!!

प्रतिनिधी

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुकीत उद्या पहिल्या टप्प्याचे मतदान होण्याच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका खास मुलाखतीत काँग्रेससह सर्व परिवारवादी पक्षांवर आज जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेस आणि देशातले सर्व परिवार वादी पक्ष लोकशाहीसाठी खऱ्या अर्थाने धोका आहेत, असे टीकास्त्र पंतप्रधान मोदी यांनी सोडले. एवढेच नाही, तर उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाचा समाजवादाशी काहीही संबंध नसून तो फक्त परिवारवादी पक्ष आहे अशा शेलक्या शब्दात मोदींनी अखिलेश यादव यांच्या पक्षाचे संभावना केली.Voting ends tomorrow in the first round of five state elections

एएनआय वृत्तसंस्थेच्या संपादिका स्मिता प्रकाश यांनी घेतलेल्या खास मुलाखतीत पंतप्रधान मोदींनी केंद्र सरकार आणि पाच राज्यातील सरकारे यावर भाष्य केले. त्याच वेळी त्यांनी काँग्रेस सह सर्व परिवारवादी पक्षांवर आपण का हल्लाबोल करतो?, याचीही कारणमीमांसा केली.



पंतप्रधान मोदी म्हणाले, की देशातल्या देशातल्या संघराज्य व्यवस्था यावर माझा पूर्ण विश्वास आहे. केंद्राने लागू केलेल्या गरीब कल्याणाच्या योजना सर्व राज्यांनी लागू कराव्यात, अशीच माझी अपेक्षा आहे. परंतु काही राज्ये केवळ भाजपशी त्यांचे मतभेद आहेत त्यामुळे गरीब कल्याणाच्या योजना त्यांच्या त्यांच्या राज्यात लागू करत नाहीत. आणि यासाठी त्यांनी आयुष्यमान भारत योजनेचे उदाहरण दिले. शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा करण्याच्या योजनेचे उदाहरण दिले. पश्चिम बंगालमध्ये आजही शेतकऱ्यांना खात्यात पैसे जमा होत नाहीत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षावर टीकास्त्र सोडताना पंतप्रधान मोदी म्हणाले, समाजवादी पक्ष हा खऱ्या अर्थाने समाजवादी नाही तर तो फक्त परिवारवादी पक्ष आहे. कारण डॉ. राम मनोहर लोहिया, जॉर्ज फर्नांडिस हे खरे समाजवादी होते. नितीश कुमार हे समाजवादी आहेत. त्यांचे परिवार कोठेही राजकारणात नाहीत. या उलट यादव परिवारातील प्रत्येकाला आमदार, खासदार मंत्री व्हायचे आहे. त्यांनी समाजवादी हे नाव घेतले आहे परंतु प्रत्यक्षात घरातल्या प्रत्येकाला त्यांनी लोकप्रतिनिधी बनवले आहे. एकाच परिवारातले सुमारे 45 लोक लोकप्रतिनिधी आहेत. हा खरा समाजवाद नाही.

काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत संपूर्ण देशात परिवारवादी म्हणजे फक्त आपल्या परिवाराचे हित पाहणारे आणि आपल्या परिवाराचे नेतृत्व लादणारे पक्ष कार्यरत आहेत आणि लोकशाहीसाठी तो सर्वात मोठा धोका आहे, असा हल्लाबोल पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केला.

Voting ends tomorrow in the first round of five state elections

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात