आनंद शिंदेंनी गाण्यातून ठाकरे – फडणवीसांना “कोलले”; म्हणाले, हे पवार साहेबांचं सरकार हाय, तुमच्या बापाच्यानं पण पडणार नाय!!


प्रतिनिधी

मंगळवेढा – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या “या सरकारचा करेक्ट कार्यक्रम मी करतो,” या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पसरलेल्या अस्वस्थतेचे दर्शन कालच्या मंगळवेढ्याच्या सभेत पडलेले दिसले. राष्ट्रवादीत नुकताच प्रवेश केलेले गायक आनंद शिंदे यांनी देवेंद्र फडणवीसांना गाण्यातून प्रत्युत्तर देताना त्यांचा बाप काढला…!! vocal artist anand shinde targets devendra fadanavis and uddhav thackeray

पण त्याच वेळी हे पवार साहेबांचे सरकार आहे, अशी दर्पोक्ती करून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनाही “कोलले.” भगीरथ भालके यांच्या प्रचारसभेत ते बोलत होतेआनंद शिंदे यांच्या सभेच्या आधी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंगळवेढ्यात सभा झाली होती. त्या सभेत फडणवीस यांनी सरकार पाडण्यासंदर्भात वक्तव्य केले होते. तोच धागा पकडत गायक आनंद शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता ‘त्यांना सांगायचंय मला’ असे म्हणत फडणवीसांच्या वक्तव्याचा एका गाण्याच्या माध्यमातून समाचार घेतला.

तुम्ही चिडवताय,
आम्ही चिडणार नाय.
तुम्ही लय काय करताय,
तसं काय घडणार नाय.
तुम्ही रडवताय
पण आम्ही रडणार नाय.
हे पवार साहेबांचं सरकार हाय,
तुमच्या बापाच्यानं पण पडणार नाय.

आनंद शिंदे यांच्या भाषणाला उपस्थितांनी जोरदार प्रतिसाद दिला. त्यावेळी रोहित पवार व्यासपीठावर हजर होते.

राष्ट्रवादीच्या सभेत अशी बाप काढण्याची भाषा काही पहिल्यांदाच झालेली नाही. सोलापूर जिल्ह्यातील सक्षणा सलगर या राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने सोलापूरमध्येच ज्येष्ठ नेते शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत मोदी – फडणवीसांच्या बद्दल असेच असभ्य उद्गार काढले होते.

vocal artist anand shinde targets devendra fadanavis and uddhav thackeray

 

महत्वाच्या बातम्या वाचा…

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण