
Virar Covid Center Fire : विरार पश्चिममध्ये असलेल्या विजय वल्लभ कोविड सेंटरच्या आयसीयूमध्ये लागलेल्या आगीत 13 रुग्णांचा मृत्यू झाला. शुक्रवारी पहाटे 3.25 वाजता लागलेल्या आगीत आयसीयूमध्ये दाखल असलेल्या 15 रुग्णांपैकी 13 जणांचा हकनाक बळी गेला. एसीमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती सध्या समोर आली आहे. परंतु प्रश्न असा आहे की, आग लागली तेव्हा कोविड सेंटरवरील कर्मचारी काय करत होते? त्यांनी स्वत:चा जीव वाचवून पळ काढल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगत आहेत? मग अत्यवस्थ असलेल्या रुग्णांना वाऱ्यावर सोडून जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना काय शासन होणार? लोकं उपचारांसाठी, कोरोनावर मात करून पुढे जगण्याची उमेद घेऊन रुग्णालयात दाखल होत असतात, त्यांनी कुणाच्या भरवशावर दाखल व्हायचं? ‘द फोकस इंडिया’चे प्रशासनाला हे काही प्रश्न आहेत. Virar Covid Center Fire and Some Incidents Shows that administration Learnt Nothing From Past
विशेष प्रतिनिधी
मुंबई : विरार पश्चिममध्ये असलेल्या विजय वल्लभ कोविड सेंटरच्या आयसीयूमध्ये लागलेल्या आगीत 13 रुग्णांचा मृत्यू झाला. शुक्रवारी पहाटे 3.25 वाजता लागलेल्या आगीत आयसीयूमध्ये दाखल असलेल्या 15 रुग्णांपैकी 13 जणांचा हकनाक बळी गेला. एसीमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती सध्या समोर आली आहे. परंतु प्रश्न असा आहे की, आग लागली तेव्हा कोविड सेंटरवरील कर्मचारी काय करत होते? त्यांनी स्वत:चा जीव वाचवून पळ काढल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगत आहेत? मग अत्यवस्थ असलेल्या रुग्णांना वाऱ्यावर सोडून जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना काय शासन होणार? लोकं उपचारांसाठी, कोरोनावर मात करून पुढे जगण्याची उमेद घेऊन रुग्णालयात दाखल होत असतात, त्यांनी कुणाच्या भरवशावर दाखल व्हायचं? ‘द फोकस इंडिया’चे प्रशासनाला हे काही प्रश्न आहेत.
मृत्यू होतात, हळहळ व्यक्त होते, पण आधीच्या घटनांवरून काहीच धडा हे शासन-प्रशासन घेणार नाही का? रुग्णालयांचे फायर सेफ्टी ऑडिट करणे गरजेचे असते? भंडारा दुर्घटनेला वर्षही उलटलेलं नाही, त्यावेळीही निष्पाप बालकांचा जीव गेला होता. ड्यूटीवरील कर्मचारी पळून जीव वाचवू शकतात, पण केवळ ऑक्सिजनच्या आधारावर आयुष्याची दोर बांधलेले निष्पाप नागरिक स्वत:चा जीव कसा वाचवतील? त्यांनी काय करायचं? एकतर रुग्णांच्या नातेवाइकांना कोरोनामुळे रुग्णालयात प्रवेश नसतो. आणि दुसरीकडे कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा असा निष्पापांचा बळी घेतो, हे कुठवर चालणार?
Maharashtra | 13 people have died in a fire that broke out at Vijay Vallabh COVID care hospital in Virar, early morning today pic.twitter.com/DoySNt4CSQ
— ANI (@ANI) April 23, 2021
कोविड सेंटरवर झालेल्या या मागच्या काही दुर्घटना पाहा…
- मुंबईच्या भांडुप परिसरात गत महिन्यात एक मॉलच्या तिसऱ्या मजल्यावर बनलेल्या कोविड रुग्णालयात रात्री 12 वाजता आग लागली होती. या आगीत 10 जणांचा जीव गेला. रुग्णालयातील 70 रुग्णांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले होते. त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले होते.
- गतवर्षी 27 नोव्हेंबर रोजी गुजरातच्या राजकोट जिल्ह्यातील एका कोविड रुग्णालयात आग लागली होती. या दुर्घटनेत पाच कोरोना रुग्णांचा जीव गेला होता. हॉस्पिटलमध्ये 33 रुग्णांवर उपचार सुरू होते. तेथे असलेल्या यंत्रामध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे कारण सांगण्यात आले होते.
- गतवर्षी 21 नोव्हेंबर रोजी ग्वाल्हेरच्या सर्वात मोठ्या रुग्णालयात जयारोग्यच्या कोविड केअर सेंटरच्या ICUमध्येही आग लागली होती. तेथे दाखल असलेले 9 पैकी 2 रुग्ण किरकोळ होरपळले होते. परंतु आगीमुळे झालेल्या पळापळीत दोन रुग्णांचा जीव गेला. एक व्हेंटिलेटरही जळून खाक झाले होते.
- गतवर्षीच 9 ऑगस्ट रोजी आंध्र प्रदेशच्या विजयवाडामध्ये एका हॉटेलमध्ये आग लागून 10 जणांचा मृत्यू झाला होता. हॉटेलला कोविड केअर सेंटर म्हणून वापरण्यात आले होते. घटनेच्या वेळी तेथे 40 रुग्णांवर उपचार सुरू होते. मेडिकल स्टाफचेही 10 जण तेथे होते.
- 6 ऑगस्ट 2020 रोजी गुजरातच्या अहमदाबादमधील श्रेय कोविड रुग्णालयात आग लागली होती. या दुर्घटनेत 8 रुग्णांचा मृत्यू झाला होता. यामध्ये 5 पुरुष आणि 3 महिलांचा समावेश होता. आग रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावर लागली होती.
- आता नाशिकमधील घटनाही ताजीच आहे. भलेही तेथे आग नव्हती लागली, परंतु ऑक्सिजनअभावी 24 रुग्णांचा तडफडून मृत्यू झाला. नाशिकमधील महानगरपालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टाकीला गळती लागल्याने दुरुस्तीसाठी 30 मिनिटे लागली. या संपूर्ण काळात ऑक्सिजनचा पुरवठा थांबलेला होता. यामुळे 24 रुग्णांचा मृत्यू झाला. ऑक्सिजन पुरवठा थांबला तेव्हा तेथे 171 रुग्ण ऑक्सिजनवर होते, तर 67 रुग्ण व्हेंटिलेटरवर होते.
या सर्व घटना पाहता रुग्ण सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. उपचारांसाठी येणारे रुग्ण हकनाक दुसऱ्याच कारणामुळे बळी जात असतील, तर यामागील कारणांचा शोध घेणं गरजेचं आहे. हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक शासन करण्याची मागणी सर्वच स्तरांतून जोर धरू लागली आहे. पुढच्यास ठेच मागचा शहाणा असे आपण म्हणतो, मग शहाणपण प्रशासनाला येणार कधी, हा गंभीर प्रश्न आहे.
Virar Covid Center Fire and Some Incidents Shows that administration Learnt Nothing From Past
महत्त्वाच्या बातम्या
- पुन्हा मृत्यूचे तांडव : विरारमधील कोविड सेंटरला भीषण आग; ICUमधील १५ पैकी १३ रुग्णांचा होरपळून मृत्यू
- कोरोना रुग्णांचे कॅशलेस विम्याचे दावे त्वरीत निकाली काढा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे प्राधीकरणाला आदेश
- रुग्णसेवेतच राम, श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट उभारणार ऑक्सिजन प्रकल्प
- उद्योगक्षेत्राला सहकार्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आश्वासन
- बलात्कारी बाबा नित्यानंदने त्याच्या देशात पर्यटकांना येण्यास घातली मनाई