पिंपरीत विकेंड लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन ; विनामास्क फिरणाऱ्या ४५१ जणांवर कारवाई


वृत्तसंस्था

पुणे : पिंपरीत कोरोनाच्या प्रसाराची साखळी तोडण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत संचारबंदीसह विकेंड कडक लॉकडाऊन लागू केला आहे. शनिवारी विनामास्क फिरणा-या ४५१ जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. Violation of Pimpri Weekend Lockdown Rules; Action against 451 people walking around without masks

पोलीस ठाण्यांतर्गत झालेली कारवाई 

एमआयडीसी भोसरी (१०७), भोसरी (११), पिंपरी (०८), चिंचवड (५९), निगडी (१०६), आळंदी (१०), चाकण (०७), दिघी (०५), सांगवी (१६), वाकड (०७), हिंजवडी (११), तळेगाव दाभाडे (२९), चिखली (११), रावेत चौकी (५४), शिरगाव चौकी (१०) या पोलीस ठाण्यांतर्गत विनामास्क फिरणा-या ४५१ नागरिकांवर कारवाई झाली.

दररोज 3 हजार रुग्ण, नागरिक बेफिकीर

पिंपरीत दररोज २, ३ हजारांच्या घरात रुग्ण आढळत आहेत. बेड न मिळाल्याने अनेकांचा जीव जात आहे. त्यामुळे शनिवार आणि रविवार विकेंड लॉकडाऊन घोषित केला आहे. पण, नागरिक घराबाहेर येत आहेत. अनेकांना कोरोनाचे गांभीर्य नसून ते नियम तोडत आहेत. त्यामुळे निर्बंध अधिक कडक केले असून, त्याचे पालन करावे, घरातच थांबावे, असे आवाहन प्रशासन व पोलिसानी नागरिकांना केले.

Violation of Pimpri Weekend Lockdown Rules; Action against 451 people walking around without masks

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात