विशेष प्रतिनिधी
मुंबई : विनोद तावडेंनी न दिलेल्या अहवालाच्या पायावर माध्यमांनी बांधली महाविकास आघाडीच्या यशाची कमान!!, असे काल दिवसभर घडले आणि रात्री उशिरा माध्यमांची “पवारबुद्धी” उघडी पडली!! Vinod tawde exposed marathi media over his so called report of BJP Shivsena’s future defeat by MVA, as he clarified he didn’t give any such report
त्याचे झाले असे :
अजितदादांच्या बंडाच्या बातम्या देताना मराठी माध्यमांनीतून स्वतःचे एक राजकीय लॉजिक तयार केले होते आणि ते लॉजिक मांडताना माध्यमांनी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी दिलेल्या एका कथित अहवालाचा हवाला दिला होता. विनोद तावडेंनी म्हणे, भाजप श्रेष्ठींना एक अहवाल दिला होता, ज्यामध्ये महाराष्ट्रात शिंदे – फडणवीस सरकार आल्यानंतर भाजपच्या जागा कमालीच्या घटून लोकसभा निवडणुकीत त्याचा मोठा फटका बसेल आणि महाविकास आघाडी भाजप – शिवसेनेवर मात करेल, असे त्या अहवालात म्हणे तावडेंनी नमूद केले होते.भाजप – शिवसेनेच्या जागा 22 पर्यंत खाली येण्याची येण्याचा धोका विनोद तावडे यांनी अहवालात दाखविला असल्याचा दावा मराठी माध्यमांनी केला होता.
दिवसभर माध्यमांद्वारे मी कोणता तरी अहवाल सादर केला आहे ज्यात राज्यात भाजपाची ताकद कमी झाल्याचा दावा केला जात आहे. असा कोणताही अहवाल मी सादर केला नसून, भाजपाची शक्ती शिंदे – फडणवीस सरकार आल्यानंतर उलट वाढलीच आहे. पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वात झालेल्या विकासामुळे महाराष्ट्रात… — Vinod Tawde (Modi Ka Parivar) (@TawdeVinod) April 18, 2023
दिवसभर माध्यमांद्वारे मी कोणता तरी अहवाल सादर केला आहे ज्यात राज्यात भाजपाची ताकद कमी झाल्याचा दावा केला जात आहे. असा कोणताही अहवाल मी सादर केला नसून, भाजपाची शक्ती शिंदे – फडणवीस सरकार आल्यानंतर उलट वाढलीच आहे. पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वात झालेल्या विकासामुळे महाराष्ट्रात…
— Vinod Tawde (Modi Ka Parivar) (@TawdeVinod) April 18, 2023
मात्र तावडेंच्या या अहवालाचा हवाला देताना प्रत्यक्षात माध्यमांनी तो नेमका कुठे, कुणाला आणि केव्हा तो अहवाल दिला आणि प्रत्यक्षात त्याची कॉपी कुठे आहे??, याची काहीही माहिती दिली नाही. फक्त महाराष्ट्र – बिहार वगैरे राज्यांची नावे देऊन सरळ – सरळ मराठी माध्यमांनी विनोद तावडे यांच्या अहवालाची बातमी “फेकली” होती!!
कारण स्वतः विनोद तावडे यांनीच रात्री 9.30 नंतर वाजता एक ट्विट करून संबंधित “तावडे अहवाला”चा पर्दाफाश करून टाकला!! आपण भाजप श्रेष्ठींना असा कोणताही अहवालाच दिला नव्हता, ज्या आधारे मराठी माध्यमांनी बातम्या चालविल्या, असे त्यांनी ट्विट मध्ये स्पष्ट केले. त्याचवेळी महाराष्ट्रात शिंदे – फडणवीस सरकार आल्यानंतर उलट भाजपची ताकद वाढली आहे आणि त्यात त्यातही मोदी सरकारच्या कार्याची आणि कल्याण योजनांची भर पडली, असा दावाही विनोद तावडे यांनी केला. मात्र या दाव्यापेक्षाही विनोद तावडे यांनी आपण कोणताही अहवाल दिला नसल्याचा स्पष्ट खुलासा केल्याने मराठी माध्यमांनी त्या नसलेल्या अहवालाच्या आधारे महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची आघाडीच्या यशाची जी कमान बांधली होती, ती क्षणार्धात कोसळली!!
कारण ज्यांच्या नावाने मराठी माध्यमे तो अहवाल खपवत होती, त्या विनोद तावडे यांनीच आपण कोणता अहवाल दिलाच नसल्याचा खुलासा केला आणि त्यातून मराठी माध्यमांची महाराष्ट्रात पवार नॅरेटिव्ह चालवण्याची “पवारबुद्धी” उघडी पडली!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App