सरकारला लाथा घातल्याशिवाय जाग येत नाही, विनायक मेटे यांचा हल्लाबोल


महाविकास आघाडी सरकारनं राज्यातील मराठा विद्यार्थी आणि उमेदवाराना 10 टक्के इडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसंग्रामने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि उच्च न्यायालयाने दणका दिला तेव्हा राज्य सरकारने आरक्षणाचा आदेश काढला. सरकारला लाथा घातल्याशिवाय जाग येत नाही, असा हल्लाबोल शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केला आहे.Vinayak Mete’s attack, government does not wake up without kicking the


विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाविकास आघाडी सरकारनं राज्यातील मराठा विद्यार्थी आणि उमेदवाराना 10 टक्के इडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसंग्रामने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली

आणि उच्च न्यायालयाने दणका दिला तेव्हा राज्य सरकारने आरक्षणाचा आदेश काढला. सरकारला लाथा घातल्याशिवाय जाग येत नाही, असा हल्लाबोल शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केला आहे.मेटे म्हणाले, महाविकास आघाडी सरकारला लाथा घातल्याशिवाय जाग येत नाही. आता उशिरा का होईना पण राज्य सरकारने आदेश काढला, त्यांचे आभार. मात्र, याबरोबरच मराठा समाजाच्या इतर प्रश्ना संदर्भातही राज्य सरकारनं तातडीनं निर्णय घ्यावेत.

अन्यथा मराठा समाजाच्या रोषाला तयार व्हा. मराठा विद्यार्थी आणि उमेदवाराना 10 टक्के इडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशात मिळणार 10 टक्के आरक्षणाचा लाभ मिळणार आहे.

त्याबरोबर सरळ सेवा भरतीत ही मराठा उमेदवार आरक्षणाचा 10 टक्के लाभ घेऊ शकतात. राज्य सरकारने शासन निर्णय जारी केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा कायदा रद्दबातल ठरवल्यानंतर मराठा समाजातील

काही संघटनांकडून इडब्ल्यूएस आरक्षण मराठा समाजाला द्यावं अशी मागणी करण्यात येत होती. त्या मागणीचा सकारात्मक विचार करुन राज्य सरकारनं मराठा समाजाला ईडब्ल्यूएस आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.

Vinayak Mete’s attack, government does not wake up without kicking the

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण