सावरकरांचे हिंदूराष्ट्र मान्य नाही, पण…; पवारांनी नाशिक मधून शिंदे – फडणवीसांना डिवचलेच, पण काँग्रेस हायकमांडलाही पुन्हा टोचले!!

प्रतिनिधी

नाशिक : सावरकर हा काही राष्ट्रीय मुद्दा नाही, असे मल्लिकार्जुन खर्गे यांच्या घरी काँग्रेस हायकमांडला सुनावून त्यांना बॅकफूटवर ढकलणाऱ्या शरद पवारांनी नाशिक मध्ये येऊन पुन्हा एकदा सावरकरांचा विषय काढला आणि काँग्रेसला डिवचले आहे. सावरकरांची पुरोगामी सामाजिक भूमिका आम्हाला मान्य आहे. पण त्यांचे हिंदू राष्ट्र संकल्पना आम्हाला मान्य नाही. त्यावर मतभेद असू शकतात, असे वक्तव्य शरद पवारांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना केले. Veer Savarkar’s hindu nation concept; sharad Pawar targets shinde fadnavis but pinched Congress highcommand again by raising issue of savarkar

शरद पवारांच्या या वक्तव्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अयोध्येतून प्रत्युत्तर दिले. सावरकरांच्या हिंदू राष्ट्र संकल्पनेविषयी पवारांना काय वाटते?, त्याविषयी आम्हाला देणे घेणे नाही. आम्हाला वीर सावरकरांची हिंदू राष्ट्राची संकल्पना मान्य आहे. भारतात बहुसंख्येने हिंदू राहतात त्यामुळे तुम्ही त्याला हिंदू राष्ट्र म्हणा अथवा म्हणू नका पण हे हिंदू राष्ट्र आहे ही वास्तविकता कोणाला नाकारता येणार नाही, असे स्पष्ट उद्गार देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

फडणवीसांच्या याच उद्गारांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्येत घेतलेल्या पत्रकार परिषदेतही दुजोरा दिला. काहींना हिंदुत्वाची ऍलर्जी आहे. त्यामुळे ते असे बोलत राहतात पण आमचे हिंदुत्व, हिंदुधर्म हा सर्वव्यापी आणि सर्वसमावेशक आहे, असे उद्गार एकनाथ शिंदे यांनी काढले.

पण पवार – शिंदे – फडणवीस या वादात सावरकरांच्या हिंदू राष्ट्राचा मुद्दा काँग्रेस आणि शरद पवार यांच्यासाठी गले की हड्डी बनला आहे.



राहुल गांधी यांनी माफीवीर म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केल्यानंतर महाराष्ट्रात प्रचंड राजकीय गदारोळ झाला. पवारांनी सावरकरांच्या सामाजिक भूमिका पुरोगामी असल्याचे सांगून काँग्रेस हायकमांडला गप्प केले होते. त्यावर काँग्रेस हायकमांडचे पवारांनी देखील या मुद्द्यावर गप्प राहावे असेच म्हणणे होते. सावरकर विषय इथेच संपला असे पवार मल्लिकार्जुन खर्गे यांच्या घरी म्हणाले होते. परंतु, पवारांनी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या घरी सांगितलेल्या मुद्द्यावर स्वतःच माघार घेतली आणि त्यांनी नागपूरच्या पत्रकार परिषदेत त्यानंतर मुंबईतल्या पत्रकार परिषदेत आणि आता नाशिक मध्ये पत्रकारांशी बोलताना सावरकरांचा विषय पुन्हा उकरून काढला. त्यामुळे काँग्रेस हायकमांडच्या संतापात भर पडली आहे.

एकीकडे काँग्रेस हाय कमांडचा एकीकडे पडणं शिंदेनी दिलेली प्रत्युत्तर आणि दुसरीकडे हायकमांडचा संताप या कात्रीत पवार सापडले आहेत आणि त्याला कारणीभूत स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मांडलेली हिंदू राष्ट्राची संकल्पना हा विषय ठरला आहे.

Veer Savarkar’s hindu nation concept; sharad Pawar targets shinde fadnavis but pinched Congress highcommand again by raising issue of savarkar

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात